भारताने अखेर करूनच दाखवले, जगाने ज्याचा साधा विचारही केला नाही तेच भारताने केले, चक्क 45000..
इराण आणि अमेरिका युद्धाला दोन महिने पूर्ण झाली आहेत. होर्मुज खाडी बंद आहे. भारतातही एलपीजीचे मोठे संकट आहे. त्यामध्येच भारताने मोठी बाजी मारली. भारताने आपली ताकद जगाला दाखवली. मोठा विजय भारताचा झाला.

इराण आणि अमेरिका युद्धाला 2 महिन्यांपेक्षा अधिक काळ झाला. मात्र, युद्ध काही थांबण्याचे नाव घेत नाही. त्यामध्येच या युद्धाचा थेट फटका भारताला बसला. भारतीय लोकांना या युद्धाच्या झळा सहन कराव्या लागत आहेत. होर्मुज खाडी ठप्प असल्याने एलपीजी गॅसचा तुटवडा आहे.

त्यामध्ये सरकारने कमर्शियल आणि पाच किलो गॅस सिलेंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केली. घरगुती गॅस सिलेंडरच्याही कमी लवकर वाढणार असल्याचे थेट मोठे संकेत आहेत.

आता होर्मुज खाडीतून जरा दिलासादायक बातमी पुढे येताना दिसत आहे.ब्लूमबर्गच्या रिपोर्टनुसार, भारताचे एक सुपर तेलवाहू जहाज ज्यात कमीत कमी 45000 टन एलपीजी गॅस आहे, त्याने होर्मुज खाडी पार केली. ज्यामुळे मोठा दिलासा मिळणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हे जहाज केसम आयलॅंडच्या जवळ होते. ओमान खाडीतून हे जहाज काही वेळात भारतात पोहोचले. होर्मुज खाडी बंद असल्याने एकही जहाज जाऊ शकत नाही. पण मोठे यश भारताला मिळाले.

भारतात एलपीजी गॅसच्या मोठा तुटवडा आहे. त्यामध्येच आता भारतात एलपीजी गॅस घेऊन येणारे मोठे जहाज दाखल होत आहे. अजूनही होर्मुज खाडीत अनेक जहाज अडकली आहेत.