
भारताचे राष्ट्रपती सशस्त्र दलांचे प्रमुख असता. त्यांना पंतप्रधानांसह अनेक महत्त्वाच्या पदांवर नियुक्त्या करण्याचा अधिकार आहे. राष्ट्रपतींना आपल्या सेवेसाठी पगार आणि विविध भत्ते देखील मिळतात.

राष्ट्रपतींना मासिक 5 लाख रुपये पगार मिळतो. तसेच त्यांना अनेक करमुक्त भत्ते देखील मिळतात. त्यांना मोफत रेल्वे आणि विमान प्रवास मिळतो. तसेच त्यांना सरकारी घर आणि सुरक्षा मिळते.

भारताच्या पंतप्रधानांना दरमहा 1.66 लाख रुपये पगार मिळतो. यामध्ये 50 हजार मूळ वेतन, 3000 रुपये खर्च भत्ता, 45000 संसदीय भत्ता आणि 2000 दैनिक भत्ता यांचा समावेश आहे.

पंतप्रधानांना पदावर असताना विविध प्रकारचे फायदे मिळतात. सरकारी घर, सुरक्षा मिळते. पद सोडल्यानंतरही त्यांना पहिल्या पाच वर्षांसाठी सरकारी घर, वीज, पाणी अशा सविधा मिळतात.

याचाच अर्थ भारतात राष्ट्रपतींना पंतप्रधानांपेक्षा जास्त पगार मिळतो. तसेच दोघांनाही सरकारकडून अनेक भत्ते मिळतात. तसेच सुरक्षा आणि घरदेखील मिळते.