
जगातील चौथ्या क्रमांकाचे रेल्वेचे जाळे भारतात असून भारतीय रेल्वेतून दररोज अडीच कोटी प्रवासी प्रवास करीत असतात आहे. अनेकांना रोजचा रोजगार या रेल्वेमुळे मिळत असतो. रेल्वेमुळे देशाचा विकास झाला आहे.

भारतीय रेल्वेने दररोज कोट्यवधी लोक प्रवास करीत असतात, म्हणून रेल्वेला देशाची लाईफ लाईन म्हणजेच जीवनरेखा देखील म्हटले जाते. चला जाणून घेऊया भारतात किती प्रकारच्या ट्रेन आहेत आणि त्यांची वैशिष्ट्ये काय आहेत.

भारतातील वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रेन. पॅसेंजर ट्रेन लहान शहरे आणि गावे यांना जोडतात. यातील बहुतांश डबे सामान्य श्रेणीचे असतात आणि तिकिटाचे दरही देखील कमी असतात.

एक्सप्रेस गाड्या : एक्सप्रेस गाड्यांचा वेग हा जादा असतो आणि या ट्रेन देशांच्या प्रमुख शहरांना जोडतात.या ट्रेन काही स्थानकांवरच थांबतात, त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या गंतव्यस्थानी लवकर पोहोचता येते


इतर स्पेशल ट्रेन्स : सुपरफास्ट ट्रेन : या जास्त वेगाने धावणाऱ्या ट्रेन असतात. (उदा. राजधानी, शताब्दी). लक्झरी ट्रेन्स : पर्यटकांच्या प्रवासासाठी आरामदायी सुविधा असलेल्या गाड्या (उदा. पॅलेस ऑन व्हील्स, डेक्कन ओडिसी ). मेट्रो आणि लोकल ट्रेन – शहरांमध्ये जलद प्रवासासाठी (उदा. मुंबई उपनगरीय लोकल, दिल्ली मेट्रो). अशा प्रकारे, भारतीय रेल्वे प्रवाशांच्या सेवेसाठी विविध प्रकारच्या ट्रेन चालवित असते.