
भारताच्या अशिष लिमाये यांनी FEI इव्हेंटिंग आशियाई चॅम्पियनशिप 2025 मध्ये इतिहास घडवत वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून भारताच्या इव्हेंटिंग क्षेत्रात नवी झेप घेतली आहे.

अशिष लिमाये यांनी त्यांचा अत्यंत विश्वासू साथीदार असलेल्या ‘विली बी डन’ या अश्वासोबत 29.4 पेनल्टींवर समाप्त करत त्यांनी अत्यंत दबावाखाली देखील स्थिर, वेगवान आणि तांत्रिकदृष्ट्या शुद्ध कामगिरी सादर केली आहे.

क्रॉस-कंट्री आणि जंपिंग फेजमध्ये मिळालेल्या डबल–क्लिअर कामगिरीमुळे आशिष लिमाये यांना या स्पर्धेतील अंतिम विजयात निर्णायक फायदा मिळाला आहे.

“आज माझा घोडा सुपर–मोडमध्ये होता. काही चुका माझ्याकडून झाल्या, पण तो मला वाचवत राहिला. आजचे सुवर्ण आमच्यासाठी अत्यंत भावनिक आहे. विशेषतः मागील आशियाई क्रीडा स्पर्धेत झालेले अपयश लक्षात घेता — आज मी स्वतःला रिडीम केलं आहे.” अशी प्रतिक्रीया अशिष लिमाये यांनी दिली आहे.

“मी हा घोडा प्रत्यक्ष न पाहताच फक्त व्हिडिओ पाहून विकत घेतला होता, आणि तो आयुष्यातील सर्वोत्तम निर्णय ठरला. आज तो केवळ माझा स्पर्धेतील केवळ सोबतीच नव्हे तर माझा साथीदारही आहे.” असेही अशिष लिमाये यांनी आपल्या अश्वाच्या विषयी भावना व्यक्त करताना सांगितले.

ही कामगिरी भारताच्या इव्हेंटिंग इतिहासातील एक अभूतपूर्व क्षण मानली जात आहे. लिमाये यांच्या विजयाने भारतीय रायडर्सना नवी प्रेरणा मिळाली असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची इव्हेंटिंगमधील उपस्थिती अधिक बळकट झाली आहे.

अशिष लिमाये यांची ही अनमोल कामगिरी, कौशल्य, संयम आणि रायडर असलेल्या अश्व यांच्यातील अभेद्य विश्वास याचे परिपूर्ण उदाहरण असल्याचे क्रीडा तज्ज्ञांचे म्हणणे आहे.