युद्धात इराण मालामाल, कितीही नुकसान झालं तरी…होर्मुझमध्ये नेमकं काय घडतंय?

इराण-इस्रायल यांच्यातील युद्धामुळे संपर्ण जगाला उर्जासंकटाच्या भीतीला तोंड द्यावे लागत आहे. परंतु युद्धात सामील असलेला इराण मात्र होर्मुझच्या सामुद्रधुनीतून खूप पैसे कमवत असल्याचे बोलले जात आहे.

| Updated on: Mar 26, 2026 | 9:36 PM
1 / 5
अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यातील युद्धामुळे संपूर्ण जगाला फटका बसला आहे. इराणने होर्मुझची सामुद्रधुनी बंद केल्याने इंधन पुरवठा करणारी जहाजे ओमानचे आखात आणि पर्शियन आखातात अडकून पडली आहेत.

2 / 5
दरम्यान, या युद्धामुळे संपूर्ण जगाला मोठी आर्थिक हानी सहन करावी लागत आहे. परंतु इराण मात्र भरपूर पैसे कमवत आहे. इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनावर जलमार्ग बंद केला आहेत. इराणी प्रशासनाच्या परवानी शिवाय कोणतेही जहाज या सामुद्र धुनीतून जाऊ शकत नाहीये.

3 / 5
इराण काही देशांच्या जहाजांना या सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी देत आहे. परंतु जहाजाला वाट सोडण्याच्या बदल्यात इराण मोठी फी घेत असल्याचे बोलले जात आहे. गल्फ कोऑपरेशन काऊन्सीलचे सेक्रेटरी जनरल यांच्या दाव्यानुसार होर्मुझमधून जहाज सुरक्षित जाऊ देण्यासाठी इराण पैसे घेत आहे.

4 / 5
दरम्यान, जहाजांकडून पैशांची वसुली करून इराण मोठा आर्थिक फायदा करून घेत असल्याचा दावा केला जातोय. दुसरीकडे इराणे अलिकडेच भारतासह इतर पाच मित्र देशांना होर्मुझमधून जहाजे नेण्यास परवागी दिली आहे. त्यामुळे भारताला या निर्णयाचा मोठा फायदा होणार आहे.

5 / 5
भारतासह, रशिया, पाकिस्तान, इराक या देशांनाही इराणने होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जाण्यास परवानगी दिली आहे. दरम्यान दुसरीकडे अमेरिकेने युद्धविरासाठी दिलेला प्रस्ताव इराणने फेटाळला आहे. त्यामुळे अमेरिका नेमकं काय करणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us