AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आमच्या जमिनीवर पाऊल ठेवले तर पाय कापू, जगावर संकट, इराणच्या धमकीने हाहाकार..

इराण आणि अमेरिका युद्धाचे परिणाम संपूर्ण जगाला मोजावी लागतात. त्यातच आता धक्कादायक माहिती पुढे येतंय. इराण आणि अमेरिका युद्ध शांत झाल्याचे वाटले असताच आता पुन्हा जगाची झोप उडवणारी धमकी देण्यात आली.

आमच्या जमिनीवर पाऊल ठेवले तर पाय कापू, जगावर संकट, इराणच्या धमकीने हाहाकार..
Mojtaba Khamenei
| Updated on: Aug 10, 2026 | 8:51 AM
Share

इराण आणि अमेरिका यांच्यात गेल्या तीन महिन्यांपेक्षा अधिक काळावधीपासून तणाव बघायला मिळाला. अमेरिकेने इराणवर मोठे हल्ले केले. यावेळी होर्मुज खाडी बंद होती. या युद्धाचा परिणाम दोन तीन देशांपुरता मर्यादित राहिला नाही. या युद्धाचा फटका जगातील अनेक देशांना बसला.  इराण आणि अमेरिका युद्धाच्या पार्श्वूमीवर आता जगाची झोप उडवणारा इशारा इराणने दिला. इराणी लष्कराने वॉशिंग्टनला कडक इशारा दिला आहे. इराणी लष्कराच्या भूदल विभागाचे कमांडर ब्रिगेडियर जनरल अली जहानशाही यांनी असा इशारा दिला की, अमेरिकाही तणावात आली. त्यांनी स्पष्ट केले की, इराणी भूमीवर पाऊल टाकणाऱ्या कोणत्याही परदेशी लष्करी दलाला ताबडतोब आणि कठोर उत्तर देण्यास आम्ही सज्ज आहोत. इराणमध्ये प्रवेश करणाऱ्याला रोखले जाईल.

इराणी सरकारी मीडियाच्या वृत्तानुसार, अली जहानशाही यांनी परकीय लष्करी घुसखोरीवर मोठा इशारा दिला. त्यांनी स्पष्ट केले की, इराणी धरतीवर कोणत्याही परकीय लष्कराच्या जवानांची घुसखोरी सहन केली जाणार नाही. जर अमेरिकेच्या लष्करातील कोणत्याही जवानाने इराणमध्ये पाऊल ठेवले तर त्याचा आम्ही खात्मा करू. कोणताही कारवाईसाठी इराण सज्ज आहे.

शत्रूच्या कोणत्याही कृतीला आम्ही कठोर आणि धक्कादायक प्रत्युत्तर देऊ. आमच्या जमिनीवर पाऊल ठेवले तर आम्ही पाय कापू असेही यादरम्यान त्यांनी म्हटले. इराण आणि अमेरिका यांच्यातील संघर्ष कुठे ना कुठे कमी होताना दिसत असतानाच आता इराणकडून जगाची झोप उडवणारी धमकी देण्यात आली. दुसरीकडे अमेरिकेने मोठा निर्णय घेतला असून देशातील शस्त्र उत्पादन वाढवले आहे.

तश्या सूचना त्यांनी प्रत्येक विभागाला दिल्या आहेत. अमेरिकेच्या मनात नक्की काय सुरू आहे, असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे. अमेरिकेचा इराणसोबतच्या युद्धात शस्त्रसाठा कमालीचा कमी झाला. त्यातच त्यांनी आता धक्कादायक निर्णय घेतला. अमेरिका आणि इराण यांच्या युद्धाचा फटका फक्त त्या दोन देशांपुरता मर्यादित अजिबात राहत नाही. याचा फटका अख्ख्या देशाला बसतो. कच्च्या तेलाच्या किमतीमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसली.

Follow Us
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची...श्रॉफ बिल्डिंगजवळ लालबागच्या राजावर पुष्पवृष्टी
93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा... लालबागच्या राजाची मिरवणूक
Lalbaugcha Raja : 93 वर्षांची परंपरा, लाखो भक्तांची श्रद्धा अन्... लालबागच्या राजाची भव्य मिरवणूक बघाच
घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
Latur Drought : घोषणा नको, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे द्या; छावा संघटनेचं आमरण उपोषण
शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
Lalbaugcha Raja : शान कुणाची? लालबागच्या राजाची! जयघोषाने मुंबई दुमदुमली...
चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
Chinchpokli Chintamani : ढोल-ताशांच्या गजरात चिमुकला थिरकला! चिंतामणीच्या मिरवणुकीतील छोट्या गणेशभक्ताचा VIDEO व्हायरल
मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा... फडणवीसांचा तो डायलॉग
Devendra Fadnavis : मी जेव्हा जेव्हा सांगतो मी पुन्हा येईल, तेव्हा मी येतोच! फडणवीसांचा तो जुना डायलॉग पुन्हा चर्चेत
धान्य, फळं अन्… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने....
Pune Ganpati Visarjan : धान्य, फळं अन् उसाची शेती… देखाव्यातून शेतकऱ्यांची व्यथा! केसरीवाडा गणपतीने वेधलं पुणेकरांचं लक्ष
ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
Lalbaugcha Raja : बाप्पाला निरोप देण्यासाठी कोळी बांधवांचा जल्लोष! पारंपरिक वेशभूषा, ढोल-ताशांचा गजर अन् मोरयाच्या जयघोषात लालबागचा राजा मार्गस्थ
मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ..
Mumbaicha Raja Visarjan : मुंबईच्या राजाची भव्य विसर्जन मिरवणूक; तरुणांचा मोठा समावेश, व्हिडिओ व्हायरल
ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत...
Ganpati Visarjan 2026 : ज्योतिबाच्या अवतारातील राजा तेजुकाया गणपतीवर पुष्पवृष्टी करत मुंबईकरांची मानवंदना