Israel Attack : जग हादरलं! इस्रायलचा येमेनवर सर्वात मोठा हल्ला, आता युद्ध पेटणार?

हुथी बंडखोरांना समूळ नष्ट करण्यासाठी इस्रायलने मोठे पाऊल उचलले आहे. मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने येमेनच्या बंदरावर थेट हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता तणाव वाढण्याची शक्यता आहे.

| Updated on: Sep 17, 2025 | 12:20 AM
1 / 5
हुथी बंडखोरांना संपवण्यासाठी इस्रायल देश पेटून उटला आहे. काहीही झालं तरी हुथी बंडखोरांना आम्ही समूळ नष्ट करणारच असे इस्रायलचे प्रमुख बेंजामीन नेतान्याहू यांनी बोलून दाखवले आहे. हाच उद्देश समोर ठेवून इस्रायलने येमेनच्या बंदराला लक्ष्य केले आहे.

2 / 5
मिळालेल्या माहितीनुसार इस्रायलने होदेदा शहरातील बंदरावर हवाई हल्ले केले आहेत. या हल्ल्यांमुळे आता येमेन आणि इस्रायल यांच्यातील वाद आणखी पेटण्याची शक्यता आहे. या हल्ल्याचा दावा इराणचे समर्थन असणाऱ्या येमेन देशातील हुथी बंडखोरांनी केला आहे.

3 / 5
या दाव्यानुसार इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांना परतावून लावण्यासाठी एअर डिफेन्स सिस्टिम सक्रिय करण्यात आली आहे. हुथी संघटनेचे प्रवक्ते याह्या सारी यांनीही इस्रायलच्या हल्ल्याबाबत एक्सवर पोस्टच्या माध्यमातून माहिती दिली आहे. इस्रायली हवाई हल्ल्यांना परतवून लावण्यासाठी आमचे एअर डिफेन्स सक्रीय करण्यात आले आहे.

4 / 5
आमच्या देशावर आक्रमकपणे हल्ला करण्यात आला आहे, असे या पोस्टमध्ये लिहिण्यात आले आहे. तर इस्रायली सेनेने आम्ही पोर्ट ऑफ होदेदामध्ये हुथींद्वारे वापरण्यात येणाऱ्या सैन्य तळांवर हल्ला करण्यात आला आहे, असे सांगितले आहे.

5 / 5
दरम्यान, आता हुथींवर केलेल्या या हल्ल्यानंतर येमेन नेमकी काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. इस्रायल-येमेन यांच्यातील संघर्ष वाढणार का हे पाहणेही महत्त्वाचे ठरणार आहे. (सर्व फोटो संग्रहित)