
बऱ्याच लोकांची सकाळची सुरूवात ही कॉफीने होते. कॉफी पिली की ताजे वाटते आणि दिवस चांगला सुरू होतो, याकरिता जवळपास सर्व लोक कॉफीने दिवसाची सुरूवात करतात.

हिवाळ्याच्या दिवसात खोकला होत असल्याने दुधाची कॉफी पिणे टाळावे असे कायमच सांगितले जाते. मात्र, खरोखरच दुधाच्या कॉफीने खोकला होतो? हा प्रश्नही अनेकदा उपस्थित केला जातो.

हिवाळ्यात दुधाच्या कॉफीपेक्षा ब्लॅक कॉफी पिणे आपल्या निरोगी आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. ब्लॅक कॉफी पिल्याने खोकल्याचा त्रास अजिबातच होणार नाही.

शिवाय वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असाल तर दुधाच्या कॉफीऐवजी कायमच ब्लॅक कॉफी फायदेशीर ठरते. ज्यामुळे वजन कमी होण्यासही मदत होते.

कॉफी पिल्याने चांगले वाटत असले तरीही कोणत्याही गोष्टीचा अतिरिक्त वापर आरोग्यासाठी धोकादायक ठरतो. दिवसातून एक किंवा दोन कप कॉफी ठीक आहे, त्यापेक्षा जास्त नको..