
महाराष्ट्रात सध्या गुन्ह्याची अनेक खळबळजनक प्रकरणं समोर येत आहेत. सध्या जळगावात एक भीषण घटना घडली आहे. या घटनेमुळे तिथे लोकांमध्ये सध्या भीतीचे वातवरण आहे. एका तरुणाचा अजब अवस्थेत मृतदेह आढळला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार जळगावात दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या बिलाल चौकातील तरुणाचा मेहरून तलावात मृतदेह आढळला आहे. हा मृतदेह आढळला तेव्हा या तरुणाची जीभ कापलेली आढळलेली आहे.

तरुणाचा अशा स्थितीतला मृतदेह दिसल्याने लोकांमध्ये वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. शेख अबुजर शेख युनूस असे मृत तरुणाचे नाव असून तो 29 वर्षांचा आहे. तो 18 सप्टेंबरपासून बेपत्ता होता.

जीभ कापलेल्या अवस्थेत हा मृतदेह आढळून आल्याने त्याच्यासोबत घातपात झाल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. मृतदेह आढळून आला यावेळी त्याची जीभ कापलेली असल्याचे समोर झाला आहे.

त्यामुळे घातपात झाल्याचा दावा मृत तरुणाचे काका शेख अमीन शेख करीम यांनी व्यक्त केला आहे. पोलिसांनी घटनेची चौकशी करून घटनेमागचे कारण तसेच घातपात करणाऱ्यांचा शोध घ्यावा अशी मागणी मयत तरुणांच्या काकांनी केली आहे.

दरम्यान या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून घटनेचा पुढील तपास पोलीस करीत आहेत. घातपाताच्या संदर्भानेही पोलीस या प्रकरणाची चौकशी करणार आहेत.