
जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातल्या कुंभार पिंपळगाव येथून शनिवारी रात्री १० वाजेच्या सुमारास गावठी पिस्तूल आणि कुऱ्हाडीचा धाक दाखवून तरुणाचे अपहरण करून हत्या करण्यात आली आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

सुरेश तुकाराम आर्दड (वय ३३, रा. राजाटाकळी) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार चार जणांनी सुरेश यांना चारचाकी वाहनामध्ये कोंबून त्यांचे अपहरण केले होते. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

अपहरण झालेल्या सुरेश आर्दड यांचा आज सकाळी बुलढाणा जिल्ह्यातील किनगाव राजा पोलीस ठाण्याच्या हद्दीत तडेगाव-टाकरखेडा रोडवर शेतात मृतदेह आढळून आला आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

या प्रकरणी सुभाष आर्दड यांच्या फिर्यादीवरून चार जणांविरोधात घनसावंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)

या संपूर्ण घटनेप्रकरणी आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांचं विशेष पथक तयार करण्यात आलं. अपहरण करणारे हे चारही जण वाळू माफिया असल्याची माहिती आता समोर येत आहे. (सांकेतिक फोटो, फोटो सौजन्य- मेटा एआय)