
शाहरुख खान याचा चित्रपट जवान हा मोठा धमाका करताना दिसतोय. जवान चित्रपटाने अनेक रेकाॅर्ड ब्रेक केले. विशेष म्हणजे आता या चित्रपटाला रिलीज होऊन तब्बल 45 दिवस झाले.

45 व्या दिवशीही जवान चित्रपट धमाका करताना दिसला. जवान चित्रपटाने 45 व्या दिवशी 30 लाखांची कमाई केलीये. म्हणजेच अजूनही लोक जवान बघण्यावर भर देत आहेत.

शाहरुख खान हा सोशल मीडियाच्या माध्यमातून जवान चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसला. या चित्रपटाला चाहत्यांनी मोठे प्रेम दिले.

शाहरुख खान याचा आता जवाननंतर लगेचच डंकी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास तयार आहे. या चित्रपटाकडून देखील मोठ्या अपेक्षा आहेत.

शाहरुख खान याचे एका मागून एक चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत असल्याने चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण हे बघायला मिळतंय.