Jay Pawar wedding: अजित दादांचा लेक जय पवारच्या लग्नाला केवळ 400 वऱ्हाडी, राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेते निमंत्रित

Jay Pawar Rutuja Patil wedding: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या चिरंजीवाच्या लग्नाला फक्त 400 पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. तसेच पक्षातून केवळ दोनच बड्या नेत्यांना निमंत्रण असल्याचे समोर आले आहे.

Updated on: Dec 03, 2025 | 2:41 PM
1 / 5
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) अध्यक्ष अजित पवार यांचा मुलगा जय पवार यांचा विवाह येत्या आठवड्यात थाटात पार पडणार आहे. जय पवार हे ऋतुजा पाटील यांच्याशी लग्न करणार आहेत. त्यांच्या लग्नसोहळा संपूर्णतः परदेशात, म्हणजे बहरीनमध्ये आयोजित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, पवार कुटुंबाच्या या महत्त्वाच्या सोहळ्याला केवळ मोजक्या 400 पाहुण्यांनाच आमंत्रण देण्यात आले आहे. त्यामध्ये राष्ट्रवादी पक्षातून फक्त दोनच नेत्यांना आमंत्रण देण्यात आले आहे. आता हे नेते कोण आहेत? चला जाणून घेऊया...

2 / 5
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून फक्त दोनच ज्येष्ठ नेत्यांना या लग्नाचे निमंत्रण आहे. यामध्ये पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांचा समावेश आहे. पक्षातील इतर बडे नेते आणि आमदार-खासदारांना निमंत्रण न देण्याचा निर्णय पवार कुटुंबाने घेतला आहे. लग्नाची ई-पत्रिका आणि कार्यक्रमपत्रिका आता समोर आली असून त्यानुसार बहरीनमध्ये चार दिवसांचा भव्य पण खाजगी सोहळा आयोजित करण्यात आला आहे.

3 / 5
जय पवारच्या लग्न पत्रिकेनुसार, ४ डिसेंबर रोजी मेहंदी समारंभ पार पडणार आहे. ५ डिसेंबरला हळद, मेहंदी आणि मुख्य विवाह सोहळा पार पडणार आहे. ६ डिसेंबर रोजी संगीत समारंभ होणार आहे. तर ७ डिसेंबरला स्वागत समारंभ आणि रिसेप्शन पार पडणार आहे.

4 / 5
गेल्या काही दिवसांपासून पवार आणि पाटील कुटुंबीयांची लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. बहरीनमधील आलिशान रिसॉर्टमध्ये हा संपूर्ण कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती आहे. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातील युवा नेते युगेंद्र पवार यांचा विवाह 30 नोव्हेंबर रोजी मुंबईतील जिओ वर्ल्ड सेंटर येथे अत्यंत दिमाखात पार पडला. त्या सोहळ्याला शरद पवार, सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, जय पवार यांच्यासह पवार कुटुंबातील सर्वजण उपस्थित होते.

5 / 5
मात्र, आता जय पवारांच्या लग्नाला मात्र अजित पवार गटाने अतिशय मर्यादित आणि खाजगी स्वरूप दिले आहे. या लग्नामुळे महाराष्ट्राच्या राजकारणातही चर्चांना उधाण आले आहे. कारण एकाच कुटुंबातील दोन लग्नसोहळ्यांमध्ये एवढा मोठा फरक पहिल्यांदाच दिसत आहे.