
भारतीय टेलिकॉम कंपनी रिलायन्स जिओने त्यांचे नवीन टॅरिफ प्लॅन जाहीर केले आहेत. किमतींमध्ये 40% पर्यंत वाढ झाली आहे. हे सर्व प्लॅन 6 डिसेंबरपासून लागू केले जातील. कंपनीने एक नवीन ऑल इन वन प्लॅन जाहिर केला आहे.

ऑल इन वन प्लॅन अंतर्गत, ग्राहकांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. 199 रुपयांच्या प्लॅनपासून सुरुवात करूया. या प्लॅनची वैधता एक महिन्यासाठी असेल. या अंतर्गत, जिओ ते जिओ मोफत कॉलिंग आहे. शिवाय तुम्ही फक्त हजार मिनिटांसाठी जिओ ते इतर नेटवर्कवर बोलू शकाल.

दुसरा प्लॅन 399 रुपयांचा आहे. या प्लॅनअंतर्गतही तुम्हाला दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. त्याची वैधता 2 महिन्यांसाठी असेल. याअंतर्गत, जिओ ते जिओ मोफत कॉलिंग, तर जिओ ते इतर नेटवर्कवर 2 हजार मिनिटे कॉलवर बोलता येईल.

तिसरा प्लॅन 555 रुपयांचा आहे. या प्लॅनची वैधता 3 महिन्यांची असते. याअंतर्गत, वापरकर्त्यांना दररोज 1.5 जीबी डेटा मिळेल. याशिवाय, जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. तर जिओ ते इतर नेटवर्कवर 3 हजार मिनिटांचे कॉलिंग उपलब्ध असेल.

चौथा प्लॅन 2 हजार 999 रुपयांचा आहे. या प्लॅन अंतर्गत 365 दिवसांची वैधता उपलब्ध असेल. या प्लॅनमध्येही दररोज 1.5 जीबी डेटा उपलब्ध असेल आणि त्यासोबतच जिओ ते जिओ अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा आहे. या प्लॅनमध्ये 12 हजार मिनिटे दिली जातील ज्याचा वापर तुम्ही जिओ ते इतर नेटवर्कवर कॉल करण्यासाठी करू शकता.

1 महिन्याच्या प्लॅनमध्ये, तीन वेगवेगळे पॅक आहेत ज्यातून तुम्ही तुमच्या आवडीचा प्लॅन निवडू शकता. तुम्हाला जास्तीत जास्त 3 जीबी डेटा मिळेल. त्याचप्रमाणे, 3 महिन्यांच्या प्लॅनमध्ये तीन पॅक आहेत. येथे दररोज 2.5 जीबी डेटा दिला जाईल. तर, 555 रुपयांच्या प्लॅनमध्ये 1.5 जीबी डेटा मिळेल. 12 महिन्यांसाठी फक्त एकच प्लॅन आहे.