किंमत केवळ 6.99 लाखाच्या आसपास, देशाच्या या 5 स्वस्तातील भारी सनरूफ कार पाहा

जर तुम्हाला सनरुफ आणि लेटेस्ट फिचर्सची कार हवी असेल तर या पाच कार तुमच्यासाठी बेस्ट पर्याय ठरतील. या कार केवळ सात लाखाच्या आसपास सनरुफची सुविधा आणि इतर भन्नाट फिचर्स देतात. हॅचबॅकपासून ते कॉम्पॅक्ट एसयुव्हीपर्यंत या बजेट-फ्रेंडली या सनरुफ कार भारी आहेत.

| Updated on: Apr 05, 2026 | 5:15 PM
1 / 5
 हुंडई आय 20 ही सनरूफची सुविधा देणाऱ्या सर्वात स्वस्त कारपैकी एक आहे. या कारची किंमत 6.99 लाख (एक्स-शोरूम) रुपयांपासून सुरु होते. यात 1.2 लिटरचे पेट्रोल इंजिन आणि मॅन्युअल आणि सीव्हीटी गिअरबॉक्स असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत. तसेच यात 10.25 इंचाची इंफोटेन्मेंट सिस्टीम आणि सहा एअरबॅग, ईबीडी सोबत एबीएस, इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी) सारखे सुरक्षा फिचर्स देखील देण्यात आले आहेत.  हुंडई आय 20 मॅग्ना एमटी पेट्रोलचे वास्तविक मायलेज सुमारे 14-19 किमी प्रति लिटर आहे.

2 / 5
 टाटा पंचच्या प्योर+एस ट्रिममध्ये सनरूफची सुविधा मिळत असून हीची सुरुवातीची किंमत 7.35 लाख रुपये आहे. यात सिंगल-पॅनल इलेक्ट्रिक सनरूफ,8 इंचाचा  टचस्क्रीन इंफोटेन्मेंट सिस्टीम, चार स्पिकर, स्टँडर्ड सहा एअरबॅग, EBD सोबत  ABS आणि ISOFIX चाईल्ड सिट माउंट्स देण्यात आले आहेत. 1.2 लिटर पेट्रोल इंजिन सोबत ही सुमारे 18-20 किमी प्रति लिटरचे मायलेज देते.

3 / 5
 टाटा अल्ट्रोझ हॅचबॅकच्या प्योर व्हेरिएंटमध्ये  सनरूफची सुविधा उपलब्ध असून या कारची किंमत सुमारे  7 लाख रुपयांपासून सुरु होते.ही पेट्रोल, डिझेल आणि सीएनजी इंजिनाच्या पर्यायासह येते. टाटा अल्ट्रोझ प्योर एस व्हेरिएंटमध्ये  इंचाचा डिजिटल ड्रायवर डिस्प्ले,  10.25 इंचाचा इंफोटेन्मेंट सिस्टीम, ऑटोमॅटिक क्लायमेट कंट्रोल आणि रिअर एसी वेंट सामील आहे.सुरक्षेसाठी यात सहा एअरबॅग, ईबीडीसोबत एबीएस,इलेक्ट्रॉनिक स्टेबिलिटी कंट्रोल (ईएससी), 360 डिग्री कॅमरा सिस्टीम आणि टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टीम (टीपीएमएस) दिली आहे. टाटा अल्ट्रोझ प्योर+एस पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंट एआरएआय प्रमाणित सुमारे 18-19 किमी प्रति लिटर मायलेज देते.

4 / 5
 भारतात सनरूफची Kia Sonet देखील उपलब्ध असून तिची किंमत  HTE(O) 1.2L पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटसाठी सुमारे 7.70 लाख रुपयांपासून सुरु होते.यात बेसिक ऑडियो सिस्टीम, चार स्पिकर आणि फ्रंट पॉवर विंडो मिळतो. सुरक्षेसाठी यात सहा एअर बॅग्स आहेत. इलेक्ट्रॉनिक स्टॅबिलिटी कंट्रोल (ESC), व्हीईकल स्टेबिलिटी मॅनेजमेंट (VSM), हिल असिस्ट कंट्रोल (HAC), EBD च्या सोबत ABS, रिअर पार्किंग सेंसर दिला आहे.  Kia Sonet HTE(O) 1.2 पेट्रोल मॅन्युअल व्हेरिएंटचा ARAI द्वारा प्रमाणित मायलेज सुमारे 18.4 किमी प्रति लिटर आहे.

5 / 5
 हुंडई एक्स्टर मायक्रो-एसयूव्हीच्या  एस स्मार्ट एमटी ट्रिमच्या पुढील व्हेरिएंटमध्ये  सनरूफची सुविधा आहे. हीची सुरुवातीची किंमत  7 लाख रुपयांहून थोडी जास्त आहे. आय 20 च्या  समान 1.2-लिटर पेट्रोल इंजिन वाली एक्स्टर सीएनजी व्हेरिएंट मध्येही उपलब्ध आहे. ज्यामुळे ही भारतात सनरूफ आणि सीएनजी इंधनाचा पर्याय देणारी सर्वात स्वस्तातील कार पैकी एक बनली आहे.एआरएआयने केलेल्या दाव्यानुसार हीचे  मायलेज सुमारे 19.4 किमी प्रति लिटर आहे.

Follow Us