AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अंडरवर्ल्डच्या दहशतीत एका रात्रीत उद्ध्वस्त झाली अभिनेत्री, अनेक वर्षांनंतर अखेर सोडलं मौन

दिग्गज अभिनेत्यांसोबत झळकलेली प्रसिद्ध अभिनेत्री अंडरवर्ल्डच्या दहशतीत एका रात्रीत झाली उद्ध्वस्त, अखेर पश्चाताप व्यक्त करत सोडलं मौन..., 90 च्या दशकात अभिनेत्रीने अनेकांच्या मनावर केलेलं राज्य...

अंडरवर्ल्डच्या दहशतीत एका रात्रीत उद्ध्वस्त झाली अभिनेत्री, अनेक वर्षांनंतर अखेर सोडलं मौन
90s Actress
| Updated on: May 22, 2026 | 12:29 PM
Share

90s Actress: 90 च्या दशकात बॉलिवूड अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली होता. बॉलिवूडमध्ये होणार मोठे निर्णय अंडरवर्ल्डच्या दहशतीखाली घेतले जायचे. एवढंच नाही तर, यामुळे अनेक अभिनेत्रींचं आयुष्य देखील उद्ध्वस्त झालं. आता देखील अशात एका अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे. जिने अंडरवर्ल्डच्या भीतीने बॉलिवूडला राम राम ठोकला. नाहीतर ती अभिनेत्री आज लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत अव्वल स्थानी असती. एककाळ असा होता जेव्हा अभिनेत्रीने फक्त चाहत्यांच्या मनावरच नाही तर, बॉक्स ऑफिंसवर देखील राज्य केलं. अभिनेत्रीने सुनील शेट्टी, गोविंदा यांसारख्या दिग्गज अभिनेत्यांसोबत काम केलं.

सध्या ज्या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे, ती अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून अभिनेत्री साक्षी शिवानंद आहे. साक्षी हिने बॉलिवूडसोबतच तेलुगू, तमिळ, कन्नड आणि मल्याळम सिनेमात देखील काम केलं. साक्षी हिचे ‘आपको पहले भी कहीं देखा है’ (2003) आणि ‘क्रोध’ (2000) यांसारखे सिनेमे आजही चाहत्यांच्या लक्षात आहेत.

साक्षी हिने करियरची सुरुवात 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अन्ना वदिना’ या तेलुगू सिनेमातून केली. त्यानंतर साक्षीने कधीच मागे वळून पाहिलं नाही. हळू – हळू साक्षी हिच्या लोकप्रियतेत वाढ होत होती. याच दरम्यान, अभिनेत्रीला अंडरवर्ल्डकडून फोन येऊ लागले. त्यानंतर अभिनेत्रीला कळंल की, ज्या सिनेमात ती काम करत आहे, त्या सिनेमाचा निर्माता अंडरवर्ल्डशी जोडलेला आहे…

सिनेमाचं नाव होतं ‘तुम’ आणि सिनेमा अभिनेता सैफ अली खान मुख्य भूमिकेत होता. यावर 2013 मध्ये दिलेल्या एका मुलाखतीत साक्षी म्हणालेली, ‘जेव्हा मला कळलं की सिनेमाचा निर्मात अंडरवर्ल्डमधील आहे, तेव्हा मी प्रचंड घाबरली. बॉलिवूड सोडून मी तेलुगू, कन्नड सिनेमांमध्ये काम करु लागली…’

पुढे अभिनेत्री म्हणाली, ‘मी सर्वांशी संपर्क तोडले. तेव्हा मला कळलं की, बॉलिवूडमधील माझं करियर उद्ध्वस्त झालं आहे. पण तेव्हा मी घाबरली नसती तर, आजही मी बॉलिवूडमध्ये सक्रिय असती. पण मी बॉलिवूडसोडून पळून गेली. ‘तूम’ सिनेमाचा निर्माता मला सतत फोन करायचा… म्हणून मला नंबर बदलावा लागला… कोणाला माहिती नव्हतं की, मी कुठे आहे… याची मला मोठी किंमत मोजावी लागली. माझं करियर मला गमवावं लागलं…’ असं देखील अभिनेत्री म्हणाली.

Follow Us
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले.
पुण्याच्या मोशीतील दुर्घटनेबाबत धक्कादायक माहिती समोर! पहिले दोन मजले...
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारण
ओमराजे निंबाळकरांबाबत सर्वात मोठी अपडेट; थेट RSS... राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर