
बॉलीवूडमधील अभिनेत्रींच्या मेकओव्हरबाबत बोलायचं झालं तर सर्वात आधी नाव येतं ते अभिनेत्री काजोलचं. बॉलिवूडमधील पदार्पणापासूनच काजोलचा लूक पूर्णपणे बदलला आहे. तसंच अनेकदा काजोललाही तिच्या लूकमुळे ट्रोल करण्यात आलं आहे.

अभिनेत्री माधुरी दीक्षितचाही लूक खूप बदलला आहे. आजकाल माधुरी चित्रपटांऐवजी रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून काम करताना दिसत आहे. विशेष म्हणजे माधुरीचा फिटनेस पाहून तुम्हाला वाटनारही नाही की ती आत्ता 55 वर्षांची आहे.

रवीना टंडनही तिच्या ग्लॅमरस लुकमुळे नेहमी चर्चेत असते. रवीना आता पूर्वीपेक्षा सुंदर झाली आहे. सध्या रवीना चित्रपटांपासून दूर आहे. पण तरीही ती कोणत्या ना कोणत्या कारणांमुळे चर्चेत असतेच.

काजोलप्रमाणेच अभिनेत्री शिल्पा शेट्टीनेही तिचा अप्रतिम मेकओव्हर केला आहे. तसंच शिल्पा शेट्टी तिच्या फिटनेसमुळही ओळखली जाते. ती नेहमी तिचे फिटनेस व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. पूर्वीपेक्षा शिल्पा आता जास्त ग्लॅमरस झाली आहे.

अभिनेत्री तब्बू अजूनही चित्रपटांमध्ये तिच्या अभिनयाची जादू दाखवताना दिसत आहे . तब्बूही तिच्या सौंदर्यामुळे नेहमी चर्चेत असते. तब्बूच्या सौंदर्यात दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. तसंच चाहत्यांमध्ये अजूनही तब्बूची क्रेझ कायम आहे.