शूटच करु नका, चालणार नाही! अमिताभना पटलं नव्हतं स्वतःचंच गाणं, सुपरहिट ठरल्यावर दिलेली प्रांजळ कबुली

2005 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'बंटी और बबली' चित्रपटातील 'कजरा रे' गाण्याने प्रचंड लोकप्रियता मिळवली. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय यांची धमाकेदार केमिस्ट्री या गाण्यात पाहायला मिळाली. मात्र, सुरुवातीला अमिताभ बच्चन यांनाच हे गाणं फारसं आवडलं नव्हतं.

| Updated on: Nov 20, 2026 | 11:58 PM
1 / 5
2005 मध्ये आलेल्या 'बंटी और बबली' चित्रपटातील 'कजरा रे' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले होते.

2005 मध्ये आलेल्या 'बंटी और बबली' चित्रपटातील 'कजरा रे' हे गाणं प्रचंड लोकप्रिय झालं. या गाण्यात अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन आणि ऐश्वर्या राय एकत्र दिसले होते.

2 / 5

या गाण्याच्या सुरुवातीला अमिताभ बच्चन यांच्यासाठी खास जुगलबंदीचा भाग ठेवण्यात आला होता. मात्र, अमिताभ यांनी स्वतः हा भाग गाण्याऐवजी शंकर महादेवन यांनी गावा, अशी इच्छा व्यक्त केली होती.

3 / 5

दिग्दर्शक शाद अली यांनी सांगितल्यानुसार, अमिताभ बच्चन यांना सुरुवातीला हे गाणं फारसं आवडलं नव्हतं. त्यांनी 'हे गाणं शूटच करू नका, चालणार नाही' अशा शब्दांत आपली शंका व्यक्त केली होती.

4 / 5

मात्र, गाणं प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. पुढे अमिताभ यांनीच दिग्दर्शकाला मेसेज करून सुरुवातीला गाण्याबद्दल चुकीचा अंदाज लावल्याची कबुली दिली.

5 / 5

या गाण्याच्या शूटिंगदरम्यान अभिषेक बच्चनचा वाढदिवस होता. दिग्दर्शकाने सेटवर सलग चार तास गाणं वाजवलं आणि कलाकारांसह सर्वांनी मनसोक्त डान्स केला. त्यातील काही मजेशीर क्षण गाण्यात वापरण्यात आले.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us