
कॉमेडियन आणि अभिनेता कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेवर पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आलाय. यावेळी त्याला थेट धमकी देण्यात आलीये. सोशल मीडियावर पोस्ट शेअर करण्यात आली आहे.

गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई टोळीने या गोळीबाराची जबाबदारी घेतली आहे. या पोस्टच्या माध्यमातून कपिल शर्माला धमकी देण्यात आली आहे की, जर त्याने रिंग ऐकली नाही तर थेट मुंबईमध्ये त्याच्यावर हल्ला केला जाईल.

कपिल शर्माच्या कॅनडातील कॅफेवर दुसऱ्यांदा हा गोळीबार झालाय. यासोबतच त्याला मुंबईत हल्ला करण्याची धमकी देण्यात आल्याने आता मोठी खळबळ उडाली आहे.

गोळीबारानंतर गोल्डी ढिल्लो नावाच्या सोशल मीडिया अकाउंटवरून पोस्ट करण्यात आली आणि लिहिले की, जय श्री राम. सतश्रीअकाल. सर्व बांधवांना राम राम...मी, गोल्डी ढिल्लो आणि लॉरेन्स बिश्नोई टोळी आज कपिल शर्माच्या कॅप्स कॅफेमध्ये झालेल्या गोळीबाराची जबाबदारी घेतो आहोत..

त्याने पुढे म्हटले की, आम्ही त्याला फोन केला तर त्याला रिंग ऐकू येत नाही म्हणून आम्हाला ही कारवाई करावी लागली. जर त्याला अजूनही रिंग ऐकू आली नाही तर आम्ही लवकरच मुंबईत पुढील कारवाई नक्की करू...