
अभिनेत्री करीना कपूर खान हिने इन्स्टाग्रामवर शंकराचा एक फोटो पोस्ट केला आहे. शंकराचा फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने चाहत्यांना देखील महाशिवरात्रीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या अभिनेत्रीची पोस्ट देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

शंकराचा एक फोटो पोस्ट करत अभिनेत्रीने कॅप्शनमध्ये 'भोलेनाथ आयुष्यातून सर्व दुःख दूर करेल... महाशिवरात्रीच्या शुभेच्छा...' असं अभिनेत्रीने लिहिलं आहे.

सांगायचं झालं, वर्षाची सुरुवात करीना आणि तिच्या कुटुंबासाठी फार वाईट होती. 16 जानेवारी रोजी एका अज्ञात हल्लेखोराने अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला केला.

हल्ल्यात अभिनेता गंभीर जखमी झाला होता. आता अभिनेत्याची प्रकृती स्थिर आहे. एवढंच नाही तर, एका मुलाखतीत सैफ त्या रात्री घडलेला सर्व प्रकार देखील सांगितला.

हल्ल्यानंतर करीना आणि सैफ यांनी मोठा निर्णय घेतला आहे. हल्ल्यानंतर दोघांनी मुलांसाठी नो फोटो पॉलिसी लागू केली आहे. करीना कायम कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असते.