
सध्या बॉलिवूड आणि टेलिव्हिजन माध्यमातून प्रेक्षकांची मनोरंजन करणारी जोडी म्हणजे अभिनेत्री कश्मीरा शाह आणि कॉमेडियन कृष्णा अभिषेक.

या जोडीविषयी तसं सर्वांनाच फारसं माहित नाही. 2012 साली कश्मीरा आणि कृष्णा यांनी लग्न केलं. या दोघांमध्ये 10 वर्षांचं अंतर असून कश्मीरा कृष्णापेक्षा १० वर्षांनी मोठी आहे.

हे फार कमी जणांना माहित असेल की कश्मीरा आणि कृष्णाच्या लव्हस्टोरीची सुरुवात 'वन नाईट स्टँड'पासून झाली होती. डिनर डेटसाठी गेलेले कश्मीरा-कृष्णा एकमेकांच्या प्रेमात पडले.

काही वर्ष डेट केल्यानंतर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या कुटुंबीयांचा या लग्नाला विरोध होता.

लग्नानंतर कश्मीराला बाळ होण्यासाठी फार अडचणींना सामोरं जावं लागलं. तब्बल 14 वेळा तिचा गर्भपात झाल्याचा खुलासा कश्मीराने केला होता.

इतक्या वेळा गर्भपात झाल्यानंतर कश्मीराने IVF ची मदतही घेतली होती. मात्र त्याचाही काही फायदा झाला नाही.

अखेर त्यांनी सरोगसीच्या मदतीने आईबाबा होण्याचा निर्णय घेतला. 2017 मध्ये सरोगसीच्या माध्यमातून कश्मीराने जुळ्या मुलांना जन्म दिला

रायान आणि क्रिशांग अशी मुलांची नावे आहेत. टेलिव्हिजन माध्यमातून आजही कश्मीरा आणि कृष्णा ही जोडी प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे