
सलमान खान याची भाची अलिजेह अग्निहोत्री हिने नुकताच फर्रे चित्रपटातून बाॅलिवूडमध्ये पर्दापण केले. अलिजेह अग्निहोत्री हिचा चित्रपट 24 नोव्हेंबर रोजी रिलीज झाला. मात्र, या चित्रपटाला ओपनिंग डेला काही खास धमाका करण्यात यश मिळाले नाही.

अलिजेह अग्निहोत्री या चित्रपटाचे जोरदार प्रमोशन करताना दिसली. फक्त अलिजेह अग्निहोत्री हिच नाही तर सलमान खान हा देखील या चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसला.

आता अलिजेह अग्निहोत्री हिच्या फर्रे चित्रपटाचे नुकताच बाॅक्स आॅफिस कलेक्शन हे पुढे आले. चित्रपटाने ओपनिंग डेला 50 लाखांची कमाई केलीये. या चित्रपटाकडून मोठ्या अपेक्षा या नक्कीच होत्या.

फर्रे चित्रपट पुढील काही दिवसांमध्ये काय धमाका करतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे. मात्र, ओपनिंग डेला चित्रपटाची नक्कीच निराशाजनक कामगिरी ही ठरली आहे.

अलिजेह अग्निहोत्री या चित्रपटाचे प्रमोशन करण्यासाठी बिग बाॅस 17 मध्ये देखील पोहचली होती. यावेळी मामा सलमान खान याच्यासोबत मस्ती करताना अलिजेह अग्निहोत्री ही दिसली होती.