
कोकणातील निसर्ग सौंदर्य अनेकांना भूरळ पाडतं. दरवर्षी पावसाळ्यात येथील नदी, डोंगर, दरी यात अधिकच खुलून दिसतात.

जर तुम्हालाही खुलेललं निसर्गाचे अनोखं रुप पाहायचं असेल तर कणकवलीतील कुंभवडे गावात एकदा नक्कीच भेट द्यायला हवी.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या कुंभवडे गावाचं निसर्ग सौंदर्य खुललं आहे.

कुंभवडे येथील निसर्गाचं मनमोहक आणि देखणं रुप प्रत्येकाला भुरळ घालत आहे.

कुंभवडे प्रामुख्याने येथील कडेकपारीतून मनसोक्त, मनमुरादपणे अनेक छोटे मोठे धबधबे प्रवाहित होतात.

तसेच येथील डोंगरावर चहूकडे ढगांची चादर ओढलेली सुद्धा पाहायला मिळते.

सध्या कोरोनाच्या पाश्वभुमीवर सिंधुदुर्ग जिल्हा पर्यटनासाठी बंद आहे. त्यामुळे पर्यटकांना येण्यास बंदी आहे.

मात्र येथील निसर्गाच हे अनोखं रूप डोळ्याचं पारणं फेडणार आहे.

सह्याद्रीच्या कडेकपारीतुन फेसाळत मुक्तपणे कोसळणारे पांढरेशुभ्र धबधबे, हिरवागार निसर्गाने पांघरलेला शालू, ऊन पावसाचा खेळ आणि धूक हे सारं सध्या कोकणात अनुभवायला मिळत आहे.