
एसटी महामंडळाच्या बसेसची परिस्थिती फारच दयनीय असते. या बसेसची स्थिती दाखवणारे अनेक फोटो आणि व्हिडीओ समोर आलेले आहेत.

दरम्यान, एसटी महामंडळाच्या अशाच एका बसची दयनीय स्थिती समोर आली आहे. या बसचा व्हिडीओ सध्या समोर आला असून लोकांत संताप व्यक्त व्यक्त केला जातोय.

या बसेसची देखभाल कोकण एसटी महामंडळाकडून केली जाते.पण ही देखभाल हवी तशी केली जात नाही. तांत्रित तपासणी होत नाही, असा आरोप केला जात आहे.

ही बस रायगडहून मुंबईकडे निघाली होती. या बसची दयनीय पाहून प्रवाशांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

व्हिडीओमधील बसच्या चाकाला फक्त तीन नट बोल्ट लावलेले होते. विशेष म्हणजे हे नट-बोल्टही अर्धे-अधिक निखळले होते. त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.