Kuku Kohli Funeral: पतीला अखेरचा निरोप देताना अरुणा ईराणींचा बांध फुटला; कुकू कोहलींच्या अंत्यदर्शनाला बॉलिवूडची गर्दी

Kuku Kohli Funeral: कुकू कोहली यांच्या पार्थिवावर मुंबईतील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी यांच्या अश्रूंचा बांध फुटला. तेव्हा कुटुंबीयांनी त्यांना सांभाळलं.

| Updated on: Aug 26, 2026 | 3:33 PM
1 / 8
ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 'फूल और कांटे', 'सुहाग' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या कुकू कोहली यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं.

ज्येष्ठ दिग्दर्शक कुकू कोहली यांच्या निधनाने बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. 'फूल और कांटे', 'सुहाग' यांसारख्या गाजलेल्या चित्रपटांचं दिग्दर्शन करणाऱ्या कुकू कोहली यांचं वयाच्या 77 व्या वर्षी निधन झालं.

2 / 8

25 ऑगस्ट 2026 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर 26 ऑगस्ट रोजी मुंबईतील ओशिवरा स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

3 / 8

कुकू कोहली यांच्या अंत्यसंस्कारावेळी त्यांची पत्नी आणि ज्येष्ठ अभिनेत्री अरुणा ईराणी अत्यंत भावूक झाल्याचं पहायला मिळालं. पतीला अखेरचा निरोप देताना त्यांना अश्रू अनावर झाले.

4 / 8

यावेळी कुटुंबीय त्यांना सांभाळताना दिसत होते. कुकू कोहली यांची अंत्ययात्रा त्यांच्या अंधेरी पश्चिम इथल्या निवासस्थानापासून सकाळी सुमारे 10 वाजता निघाली, तर दुपारच्या सुमारास अंत्यसंस्कार करण्यात आले.

5 / 8

कुकू कोहली यांच्या अंत्यसंस्कारासाठी बॉलिवूड अनेक कलाकार आणि दिग्गज उपस्थित होते. विकी कौशल आणि कतरिना कैफ यांनीही ओशिवरा स्मशानभूमीत पोहोतून कुकू कोहली यांना श्रद्धांजली वाहिली.

6 / 8

याशिवाय दिग्दर्शक रोहित शेट्टी, जावेद अख्तर, शबाना आझमी, श्याम कौशल, रझा मुराद, दीपक पराशर आणि टीकू तलसानिया यांच्यासह अनेक कलाकार अंत्यसंस्काराला उपस्थित होते.

7 / 8

कुकू कोहली हे अभिनेता अजय देवगणच्या करिअरमधील महत्त्वाचे नाव मानले जातात. 'फूल और कांटे' या चित्रपटातून अजय देवगणने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. या चित्रपटाचं दिग्दर्शन कुकू कोहली यांनी केलं होतं.

8 / 8

त्यानंतर त्यांनी ‘सुहाग’, ‘हकीकत’, ‘अनाडी नंबर 1’, ‘जुल्मी’ आणि ‘ये दिल आशिकाना’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन त्यांनी केलं. कुकू कोहली यांच्या निधनानंतर अजय देवगणनेही सोशल मीडियावर भावूक पोस्ट लिहित श्रद्धांजली अर्पण केली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us