
नवीन वर्षाचे स्वागत आणि सारख्या वर्षाला निरोप देण्यासाठी पंढरपूरमध्ये लाखो भाविक दाखल झाले आहेत. मोठ्या भक्तीभावाने नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी भाविक मंदिर परिसरात जमले आहेत.

एकादशी आणि 31 डिसेंबर एकाच दिवशी आल्याने वारकरी आणि सर्वसामान्य व्हावी अशी दोघांचीही गर्दी पंढरपुरात झालेली पाहायला मिळत आहे. त्यामुळे सर्वत्र भक्तीमय वातावरण दिसून येत आहे.

सांगायचं झालं तर, अनेक जण नव्या वर्षीची सुरुवात पांडुरंगाच्या दर्शनाने करतात. त्यामुळे सध्या पंढरपुरात मोठी गर्दी जमली आहे. सध्या तेथील फोटो व्हायरल होत आहेत.

गेल्या काही दिवसांपासूनच गर्दीचा ओघ सुरू असून आज गर्दीत वाढ होताना दिसत आहे. नवीन वर्षानिमित्त विठ्ठल मंदिरात फळे, फुले आणि दिव्यांची सुंदर सजावट केली जाते, ज्यामुळे वातावरण अधिक मंगलमय होते.

हजारो वारकरी 'विठ्ठल, विठ्ठल' नामघोषात आणि भक्तीच्या वातावरणात नवीन वर्षाचे स्वागत करतात. नवीन वर्ष सुरु होणार असल्यामुळे दर्शनासाठी भाविकांची मोठी रांग लागते, तरीही भाविकांचा उत्साह टिकून असतो.