
Skoda India ने Kushak mid-size SUV चे नवीन मिड-स्पेक मॉडेल लॉन्च केले आहे. नवीन Skoda Kushaq Ambition Classic मॉडेल 12.69 लाख रुपयांना (एक्स-शोरूम) च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च करण्यात आली आहे.

Skoda Kushaq चे Ambition Classic प्रकार हे SUV च्या श्रेणीतील दुसरे बेस मॉडेल आहे. हे बेस-स्पेक ऍक्टिव्ह आणि मिड-स्पेक अॅम्बिशन ट्रिम्समधील एक प्रकार आहे.

या नवीन मॉडेलमध्ये फ्रंट बंपर, डोर, विंडो लाइन व टेलगेट्स क्रोम गार्निशिंगचा देखील समावेश आहे. यात वायरलेस अँड्रॉइड ऑटो आणि ऍपल कारप्ले कनेक्टिव्हिटीसह 10.0-इंच टचस्क्रीन इन्फोटेनमेंट सिस्टमचाही समावेश आहे.

SUV च्या इतर सुधारित प्रकारांमध्ये 1.5-लीटर TSI इंजिन देखील मिळते. जे 148 hp उत्पादन करते जे 6-स्पीड मॅन्युअल गिअरबॉक्स आणि 7-स्पीड DSG सोबत येते.

कंपनीने नवीन Skoda Kushaq Ambition Classic प्रकार चार ड्युअल-टोन रंगांमध्ये सादर केले आहे. यामध्ये ब्लॅक रूफसह ब्रिलियंट सिल्व्हर, ब्लॅक रूफसह कॅंडी व्हाईट, ब्लॅक रूफसह टोर्नाडो रेड आणि ब्लॅक रूफसह हनी ऑरेंज कलर पर्यायांचा समावेश आहे.