
अभिनेत्री कंगना राणौत नेहमीच तिच्या फॅशन आणि स्टाइलमुळे चर्चेत असते. भारतीय ते वेस्टर्न लूकमध्ये कंगना नेहमीच दिसते. पण सिल्क साड्यांच्या कलेक्शनचा विचार केला तर कंगनाचे नाव सर्वात वर येते.

कंगना राणौत बऱ्याच दिवसांपासून पारंपारीक लूकमध्ये म्हणजेच साडीमध्ये दिसते आहे. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी कंगनाची साडी इतकी खास आणि वेगळी असते की सगळ्यांच्या नजरा तिच्या साडीवरच पडतात.

तुम्हालाही कोणत्याही पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी उत्तम सिल्कची साडी नेसायची असेल, तर प्रत्येकाने कंगना राणौतच्या कलेक्शन बघितले पाहिजे. कंगनाकडे अनेक प्रकारच्या सिल्क साड्या आहेत.

विशेष म्हणजे कंगनाने आतापर्यंत प्रत्येक सिल्कच्या साड्या नेसल्या आहेत. फिकट रंग असो किंवा गडद, प्रत्येकामध्ये कंगना खास दिसते.

कंगनाच्या साड्यासारख्या साड्या तुम्हीही खरेदी करू शकता. कारण तिच्या अनेक साड्या आपल्या बजेटमध्ये बसणाऱ्याच आहेत.