किचनमध्ये झुरळांचा त्रास आहे का? मग हे पाच उपाय करा आणि काही मिनिटात सुटका मिळवा

किचनमध्ये झुरळ दिसलं की काहीच खाण्यापिण्याची इच्छा होत नाही. इतकंच काय तर झुरळांना पळवून लावण्यासाठी केलेले उपायही कामी येत नाही. त्यामुळे आणखी डोकेदुखी वाढते. तुमच्या किचनमध्ये झुरळं वाढली असतील तर तुम्ही या पाच सोप्या उपायांनी त्यांना पळवून लावू शकता.

| Updated on: May 05, 2025 | 3:47 PM
1 / 6
घरात झुरळं झाली की मन रमत नाही. जिथे पाहावं तिथे झुरळांचा मुक्त वावर सुरु होतो. अशा स्थितीत कोणी घरी आलं तर लाज गेल्याची भावना निर्माण होते. तुम्हालाही झुरळांचा त्रास असेल आणि झुरळांपासून कायमची सुटका हवी असेल तर काही घरगुती उपाय करू शकता. या उपयांमुळे झुरळांचा घरातून कायमचा नायनाट होईल.

2 / 6
बोरिक पावडर आणि साखरेचं मिश्रण : झुरळं पळवून लावण्यात हे मिश्रण फायदेशीर असल्याचं दिसून आलं आहे. बोरिक पावडर आणि साखरेचं समान मिश्रण करून झुरळांचा वावर असलेल्या ठिकाणी टाका. झुरळं साखरेकडे आकर्षित होतात. पण बोरिक पावडरमुळे मरतात.

3 / 6
बेकिंग सोडा आणि साखरेचं मिश्रण : बेकिंग सोडा आणि साखरेचं मिश्रण झुरळांसाठी कर्दनकाळ ठरतं. या दोन्ही वस्तूंचं समान मिश्रण करावं. तसेच अधिक प्रमाणात झुरळं दिसतात तिथे टाकवं. हे मिश्रण खाताच झुरळं मरतात.

4 / 6
तमालपत्र : झुरळांपासून मुक्त होण्यासाठी तमालपत्र देखील उपयुक्त ठरू शकते. तमालपत्राची पावडर करा आणि किचनमध्ये कोपऱ्यात व्यवस्थितरित्या पेस्ट करून लावा. तसेच  पाण्यात तमालपत्र घाला आणि ते उकळी आणा. आता झुरळांवर फवारण्यासाठी हे तमालपत्राचे पाणी वापरा.

5 / 6
कडुनिंबाचं तेल : कडुनिंबात कीटकनाशक गुण आहेत. किचनमधील झुरळं पळवून लावण्यात मदत होते. या तेलाचा झुरळं असलेल्या ठिकाणी स्प्रे करावा. यामुळे झुरळं घरातून पळून जातात.

6 / 6
साफसफाई : झुरळं घरात होऊच नये यासाठी काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठी रात्र किचनमध्ये उष्टी भांडी राहणार नाही याची काळजी घ्या. तसेच कचऱ्याचा डबा व्यवस्थितरित्या झाकून ठेवा. यामुळे झुरळं घरात होत नाहीत. (सर्व फोटो- टीव्ही 9 नेटवर्क)