
बेडरूम ही अशी जागा आहे, जिथे आपण दिवसभर काम करून दमल्यानंतर आराम करतो. याच कारणामुळे बेडरुममध्ये नकारात्मक उर्जा निर्माण होईल, अशा वस्तू असून नयेत, असे सांगितले जाते.

बेडरुममध्ये काही गोष्टी ठेवणे आवर्जुन टाळायला हवे. हे नियम पाळण्यास बेडरुम तसेच घरात सकारात्मक उर्जा कायम राहते, असे सांगितले जाते. बेडरुमच्या भिंतीला गडद हिरवा रंग कधीच देऊ नये असे सांगितले जाते.

बेडरुममध्ये दरवाजाच्या समोर कधीच बेड लावू नये. तुमचा बेड ठिक दरवाजाच्या समोरच असेल तर लगेच त्याची जागा बदला. तसे केल्यास बेडरुममध्ये सकारात्मक उर्जा निर्माण व्हायला मदत मिळेल.

आपण अनेकदा बेडरुममधील पलंगाच्या खाली बऱ्याच गोष्टी ठेवून देतो. मात्र बेडच्या खाली सामान ठेवू नयेत. तुम्हीही काही वस्तू ठेवल्या असतील तर त्या लगेच दुसऱ्या ठिकाणी ठेवून द्याव्यात.

तुम्ही बेडरुममध्ये नकारात्मक उर्जा येईल असे फोटो ठेवू नयेत. अशाा प्रकारचे फोटो असतील तर ते लगेच काढून टाकले पाहिजेत. सोबतच बेडरुममध्ये पूजाघर असू नये, असेही सांगितले जाते.

Disclaimer: वरच्या लेखातील माहिती ही प्राथमिक स्वरुपाची आहे. आम्ही या माहितीची पुष्टी करत नाही किंवा समर्थनही देत नाही. या लेखाच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा उद्देश नाही. वरच्या लेखात दिलेल्या माहितीवरून कोणताही निर्णय घेण्याआधी त्या-त्या क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला आवश्य घ्या.