
आपल्या सर्वांनाच माहिती आहे की, ड्रायफ्रूट्स हे उष्ण असतात. ते थेट खाणे पोटासाठी हानिकारक ठरू शकते. काही ड्रायफ्रुट्स भिजवलेले खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. भिजवलेले ड्रायफ्रुट्स खाल्ल्याने पचनाशी संबंधित समस्या अजिबात निर्माण होत नाहीत.

बदाम हे नेहमीच भिजवून खाणे फायदेशीर ठरते. त्याचा प्रभाव गरम असतो आणि ते थेट खाल्ल्याने पोट खराब होऊ शकते. बदामाच्या त्वचेमध्ये टॅनिन असते, जे पचण्यास कठीण असते. यामुळे नेहमीच बदाम भिजवून खा.

अनेक गोड पदार्थांमध्ये मनुक्याचा वापर केला जातो. मात्र, कधीही मनुके हे भिजवून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. मनुका पाणी नियमित प्यायल्याने त्वचा सुंदर होण्यास मदत होते.

अक्रोड भिजवून खाणे आरोग्यासाठी फायदेशीर ठरते. मात्र, जर आपण अक्रोड भिजवून खाल्लेतर त्यामुळे त्यामधील ओमेगा -3 फॅटी ऍसिड्स निघून जाते. यामुळे नेहमीच अक्रोड भिजवून खाऊ नका.

काजू कधीही भिजवून खाल्ले जात नाहीत. मात्र, कधी कधी काजू भिजवून खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरतात. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)