
तुमचे ओठ सुंदर बनवण्यासाठी आतून हायड्रेट राहणे खूप महत्वाचे आहे. पाणी पिण्याने त्वचेच्या समस्याही दूर राहतात. तज्ञांच्या मते, तुम्ही दररोज सुमारे 3 लिटर पाणी प्यावे. जास्त पाणी पिल्यामुळे ओठ मुलायमदार राहण्यास मदत होते.

बऱ्याच लोकांच्या ओठांवर काळे डाग तयार होतात. तज्ज्ञांच्या मते, कॉफी, चहा आणि वाइनसारख्या द्रवपदार्थांमुळे ओठ काळे होऊ शकतात. यामुळे हे काळे डाग टाळण्यासाठी तुम्ही स्ट्रॉची मदत घेऊ शकता.

ओठांवर घाण साचल्याने आणि त्यांची काळजी न घेतल्याने त्वचेवर मृत पेशी जमा होतात. ओठांचा रंग सुधारण्यासाठी घरी मध आणि ओट्सने स्क्रब करा. ओट्स मृत पेशी काढून टाकतील, तर मध ओठ मऊ करण्यास मदत करते.

काही महिला 24 तासांपैकी जवळपास 12 ते 13 तास ओठांवर लिपस्टिक ठेवतात. यामुळे ओठ खराब होण्यास सुरूवात होते. यामुळे नेहमीच ओठांवर लिपस्टिक लावताना थोडा विचार केला पाहिजे.

ज्याप्रमाणे तुम्ही सनस्क्रीनने तुमचा चेहरा सुरक्षित ठेवता, त्याचप्रमाणे ओठांनाही संरक्षक कवच आवश्यक असते. हेवी एसपीएफ असलेल्या लिप बामने तुम्ही ओठांना उष्णतेमध्ये सुरक्षित ठेऊ शकता. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्कीच घ्या)