
तुमच्या त्वचेसाठी त्वचा उत्पादनांचा वापर करा. जे तुमच्या त्वचेच्या प्रकारासाठी योग्य आहेत. तुमच्या त्वचेवर मुरूमाची समस्या असल्यास तुम्ही कोरफड, सॅलिसिलिक अॅसिड, तुळशी अर्क, कॅमोमाइल यासारखे उत्पादने वापरावीत. हे घटक चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यास मदत करते.

फेस वॉश आणि मॉइश्चरायझर आपल्या त्वचेसाठी अत्यंत फायदेशीर आहे. ही दोन्ही उत्पादने आपली त्वचा स्वच्छ आणि मॉइस्चराइज ठेवण्यास मदत करतात. तुमच्या त्वचेच्या प्रकारानुसार तुम्ही फेस वॉश आणि मॉइश्चरायझर वापरावे.

आपल्या त्वचेची काळजी घेणे खूप आवश्यक आहे. आपली त्वचा निरोगी आणि पोषित ठेवण्यासाठी रात्री झोपण्याच्या अगोदर कधीही न विसरता चेहऱ्यावरील मेकअप काढा. मॉइश्चरायझर किंवा नाईट क्रीम वापरा.

दररोज जास्त पाणी पिल्याने त्वचा निरोगी राहण्यास मदत होते. यामुळे मुरूमाची समस्या देखील दूर होते. आपण दिवसाला सुमारे 8 ग्लास पाणी पिले पाहिजे. यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास मदत होते.

दररोज सनस्क्रीन वापरा. बाहेर पडण्यापूर्वी, आपली त्वचा हानिकारक किरणांपासून वाचवण्यासाठी आपण सनस्क्रीन वापरली पाहिजे. सनस्क्रीन लावल्याने आपली त्वचा तजेलदार देखील राहते.