
या हंगामात आरोग्याकडे विशेष लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे. कारण या हंगामात सर्दी, ताप आणि खोकला या समस्यांमध्ये वाढ होते. हिवाळ्यामध्ये शक्यतो बाहेरचे खाणे देखील टाळले पाहिजे.

दररोज सकाळी या हंगामात आपण आले, संत्री आणि गाजराचा रस घेतला पाहिजे. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

संत्र्यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. यामुळे हंगामी रोग आपल्यापासून दूर राहतात.

गाजरामध्ये बीटा-कॅरोटीन आणि फायबरचे प्रमाण जास्त असते. जे वजन कमी करण्यास आणि पचनास मदत करते. यामुळे आपण दररोज सकाळी गाजराचा रस घेतला पाहिजे.

आले आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. हे पचन आणि पोटदुखीसाठी फायदेशीर आहे. यात दाहक-विरोधी गुणधर्म आहेत. आपल्या दररोजच्या आहारामध्ये आल्याचा समावेश केला पाहिजे.