
एका भांड्यात एक चमचा बेकिंग सोडा घेऊन पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. शॅम्पू केल्यानंतर केसांना लावा आणि काही मिनिटांनंतर साध्या पाण्याने धुवा. यानंतर केसांना कंडिशनर नक्की लावा. त्यामुळे केसांना येणारे अतिरिक्त तेल नियंत्रित करता येते. यामुळे केसांचा चिकटपणा दूर होण्यास मदत होते.

ब्लॅक टी राइस बनवण्यासाठी ब्लॅक टी बॅग घ्या आणि गरम पाण्यात उकळा. आंघोळ करताना हे चहाच्या पानाचे पाणी केसांना लावा, तज्ज्ञांच्या मते या रेसिपीने केसगळती कमी होऊ शकते.

ऍपल सायडर व्हिनेगर केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. एका भांड्यात पाणी घ्या आणि त्यात दोन चमचे ऍपल सायडर व्हिनेगर घाला. आंघोळ करताना शॅम्पू करण्यापूर्वी केसांना लावा. हे केसांसाठी खूप जास्त फायदेशीर आहे.

त्वचा आणि केसांसाठी कोरफड अत्यंत फायदेशीर आहे. कोरफड केसांच्या अनेक समस्या दूर करण्यास मदत करते. यासाठी केस धुण्याच्या अगोदर आपल्या केसांना कोरफड लावा आणि नंतर शॅम्पू करा.

टाळूवरील कोंडा दूर करण्यासाठी लिंबू अत्यंत फायदेशीर आहे. यासाठी एक कपमध्ये पाणी घेऊन त्यात दोन चमचे लिंबाचा रस घाला. हे केसांना लावा आणि नंतर शॅम्पू करा. नंतर कंडिशनर करायला विसरू नका. (वरील टिप्स फाॅलो करण्याच्या अगोदर डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्या)