
वजन कमी करणे सोपे काम नाही आणि पोटाची चरबी कमी करणे अधिक कठीण आहे. वजन कमी करण्यासाठी व्यायाम आणि आहाराची काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते वजन कमी करण्यासाठी 70 टक्के आहार आणि 30 टक्के व्यायाम कारणीभूत आहेत. मात्र, लसूण आपले वजन कमी करण्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे.

लसूण

लसूण हे रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे आहे. हे शरीराच्या मज्जातंतूंना आराम करण्यास मदत करते, तसेच रक्तदाब नियंत्रित करण्यास मदत करते आणि रक्तवाहिन्यांचे नुकसान टाळते.

हृदयविकाराचा धोका कमी करण्यास देखील लसूण फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी, फायबर, कॅल्शियम आणि मॅंगनीज सारख्या महत्त्वपूर्ण पोषक तत्वांचा समावेश आहे.

दररोज सकाळी आपण उपाशी पोटी चार ते पाच पाकळ्या लसूण खाल्ला पाहिजे. यामुळे आपल्या पोटावरील चरबी झटपट कमी होण्यास मदत होते.