
पालक - सकाळचे जेवण तयार करण्यासाठी हिरव्या पालेभाज्यांचा वापर केला जाऊ शकतो. दररोज सकाळी नाश्त्यामध्ये पालकचा समावेश करा. आपण सँडविचमध्ये देखील पालक मिक्स करू शकता.

सूर्यफूलाच्या बिया - या लहान बियांमध्ये व्हिटॅमिन ई भरपूर प्रमाणात असते. सूर्यफूलाच्या बिया भाजून आपण खाल्ल्या पाहिजेत. दररोज एक मूठभर तरी सूर्यफूलाच्या बिया खा.

एवोकॅडो - एवोकॅडो खाणे आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. एवोकॅडो मॅश करून टोस्ट देखील बनवू शकता. नाश्त्यासाठी एवोकॅडो हा एक उत्तम पर्याय आहे.

'या' गोष्टींचा करा आहारात समावेश, विटामीन ई ची कमकरता होईल दूर

बदाम - आरोग्य तज्ञांच्या मते, 5 बदाम रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी सोलून त्यांचे सेवन करा. तुम्ही सकाळी उठल्याबरोबर खा किंवा नाश्त्यामध्ये हे बदाम खा.