
वजन कमी करण्यासाठी आणि निरोगी जीवन जगण्यासाठी दिवसाची सुरूवात नेहमीच हेल्दी ड्रिंकने केली पाहिजे. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पितात. यामध्ये व्हिटॅमिन सीचा चांगला स्रोत असतो.

बडीशेपचे पाणी देखील आपण हेल्दी ड्रिंकमध्ये घेऊ शकतो. यासाठी बडीशेप रात्रीभर पाण्यात भिजवून ठेवा आणि ते पाणी सकाळी गरम करून प्या. हे देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे.

मेथी आणि जिरे देखील रात्रभर पाण्यात भिजून ठेवा आणि सकाळी त्याचे पाणी प्या. यामुळे वजन कमी होण्याबरोबरच रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास देखील मदत होते.

ग्रीन टी देखील आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. ग्रीन टी फक्त आरोग्यासाठीच नाहीतर त्वचेसाठी देखील फायदेशीर आहे. यामुळे आपण दररोज सकाळी ग्रीन टीचे देखील सेवन करू शकता.

गरम पाण्यात लिंबू मिक्स करून पिणे असो किंवा मेथी आणि जिरे यांचे खास पेय असो. यांचा आहारात समावेश करण्याच्या अगोदर आपण डाॅक्टरांचा सल्ला नक्की घ्यायला हवा. कारण जिऱ्याचे पाणी गरम असते आणि एप्रिल, मे आणि जून यांसारख्या महिन्यांमध्ये मर्यादित किंवा टाळावे.