
बॉलिवूड चित्रपटांची प्रसिद्ध ‘आयटम गर्ल’ असलेल्या अभिनेत्री मलायका अरोराचे लाखो चाहते आहेत. या वयातही तिच्या फिटनेसनं चाहत्यांना वेड लावलं आहे.

मलायकाने बॉलिवूडचे प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेल्या साडीमध्ये द कपिल शर्मा शोमध्ये दिसली. ती साडीमध्ये खूप सुंदर दिसत होती.

मलायकाची ही मल्टी सेक्विन फॉरेस्ट ग्रीन साडी तुम्ही देखील कॅरी करू शकता. या साडीमध्ये अनेक रंग, स्टेटमेंट प्रिंट्स आहेत.

या साडीमध्ये मल्टी-शेड सेल्फ सेक्विन एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे. ज्यामुळे ही साडी आणखी सुंदर बनत आहे.

जर तुम्हाला मलायकाची ही साडी खूप आवडत असेल, तर तुम्ही देखील अशी साडी घेऊ शकता. डिझायनरच्या वेबसाइटवर या साडीची किंमत 1, 35,000 रुपये आहे.