
पुण्यातील कचरावेचक कामगार अंजू माने यांना दहा लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कचऱ्यात सापडली. त्यांनी ही सापडलेली रक्कम ज्या व्यक्तीची होती, त्यांना परत केली आहे. त्यामुळे अंजू माने यांच्यावर कौतुकाचा वर्षाव सुरू झाला आहे.

अंजु माने या लहानपणापासून कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.आजच्या महागाईच्या काळात तुटपुंज्या वेतनात कष्टाने दोन्ही अपत्यांचा सांभाळ करीत मुलांवरही प्रामाणिकपणाने जगण्याचे संस्कार केले आहेत.

लबाडी करायची नाही खोटं बोलायचं नाही कोणाला फसवायचं नाही आणि कष्टाने करून खायचं असे आवाहन अंजू माने यांनी या निमित्ताने सर्वांना केले आहे.

अंजू माने या महिन्याला पाच हजार कमावते. त्या लहानपणापासून कचरा वेचण्याचे काम करतात. त्यांना दहा लाख रुपयांची बॅग कचऱ्यात सापडली. ज्या व्यक्तीची ती बॅग होती त्याचा बीपी लो झाला होता. त्याला आपण पाणी पाजले आणि त्याचे पैसे परत केले.

आपल्याला काम करताना कचऱ्यात कोणाचा मोबाईल, कोणाच्या अंगठ्या सापडत असतात. त्या आपण त्यांना परत करतो. माझ्या प्रामाणिकपणा बद्दल पुण्यातील लोकांनी सत्कार केला हेच माझे पुण्य असल्याचे अंजू यांनी म्हटले आहे.