बायको मिळते भाड्याने… लोकांच्या लागल्या रांगा, पसंत आली तर… कुठं घडतं हे?
थायलंड, पर्यटनाचे केंद्र असूनही, 'पत्नी भाड्याने' या वादग्रस्त प्रथेमुळे चर्चेत आहे. "वाइफ ऑन हायर" किंवा "ब्लॅक पर्ल" नावाने ओळखल्या जाणाऱ्या या तात्पुरत्या विवाहात महिला आर्थिक गरजांसाठी परदेशी पर्यटकांसोबत तात्पुरते संबंध ठेवतात. एका पुस्तकाने ही प्रथा समोर आणली आहे, ज्यात पटायासारख्या ठिकाणी तिचे व्यावसायिकरण कसे झाले आहे हे स्पष्ट होते.

आशिया खंडातील थायलंड हा एक महत्त्वाचा देश आहे. या देशात नेहमीच पर्यटकांची वर्दळ असते. जगभरातील पर्यटक थायलंडचा अथांग समुद्र पाहण्यासाठी येत असतात. त्यामुळेच बाराही महिने थायलंडमध्ये नागरिकांची वर्दळ असते. पर्यटन हा या देशाचा मुख्य उत्पन्नाचा स्त्रोत आहे. स्थानिकांची आजीविका त्यावरच अवलंबून आहे.
पर्यटनामुळे थायलंड प्रसिद्ध आहेच. पण आणखी एका कारणाने थायलंड प्रसिद्ध आहे. ती म्हणजे बायको भाड्याने मिळण्याची प्रथा. एका पुस्तकामुळे थायलंडमधील भाड्याने बायका मिळत असल्याच्या प्रथेची चर्चा सुरू झाली आहे. थायलंडच्या पटाया येथील परंपरेत याचं मूळ आहे. या परंपरेनुसार, लोक भाड्याने बायको घेऊ शकतात. त्याला "वाइफ ऑन हायर" आणि "ब्लॅक पर्ल" (black pearl) असंही संबोधलं जातं. हा तात्पुरता विवाह असतो. मुलीला पैसे देऊन काही काळासाठी पत्नी बनवता येते. या काळात ती सर्व कर्तव्य पार पाडते. आता ही प्रथा एक व्यवसाय म्हणून पुढे आली आहे.
लावर्त ए इमॅन्यूएल यांचे "थाई टॅबू – द राइज ऑफ वाइफ रेंटल इन मॉडर्न सोसायटी: एक्सप्लोरिंग लव्ह, कॉमर्स अँड कॉन्ट्रोव्हर्सी इन थायलंड्स वाइफ रेंटल फेनोमेनन" (The book that became a talking point is written by La Vérité Emmanuel. Titled Thailand's Taboo: The Rise of Wife Rental in Modern Society) या पुस्तकात या प्रथेची चर्चा करण्यात आली आहे. इमॅन्यूएल यांनी या ट्रेंडबद्दलची माहिती जगाला दिली आहे.
थायलंडमध्ये पत्नी भाड्याने मिळण्याची प्रथा कशी पडली आणि त्याचं आता व्यावसायिकरण कसं झालं? याचा आढावा या पुस्तकात घेण्यात आला आहे. हा व्यवसाय महिलांचं कमाईचं साधन बनलं आहे, असंही या पुस्तकात म्हटलं आहे. परदेशातून मोठ्या प्रमाणावर पर्यटक येत असतात. त्यामुळे ग्रामीण भागातील मुली पैशासाठी रेंटल वाईफ बनत आहेत. हा ट्रेंड थायलंडच्या पटाया रेड लाइट एरिया, बार आणि नाईट क्लबमधून चालवला जात आहे. थायलंडमध्ये बिझनेस म्हणून याचा विस्तार वेगाने होत आहे, असंही पुस्तकात नमूद करण्यात आलं आहे.
खरं तर रेंटल वाईफ ही वादग्रस्त प्रथा आहे. गरीब घरातील मुली पैशासाठी विदेशी पर्यटकांसोबत पत्नी बनून राहत आहेत. हे औपचारिक लग्न नसते. तर तो अस्थाई करार असतो. म्हणजे कित्येक दिवस ते कित्येक महिन्यापर्यंत हा करार केला जातो.
पैसे कमावण्यासाठी आणि कुटुंबाचं भरणपोषण करण्यासाठी महिला अशा प्रकारचं काम करत आहेत. या महिला खासकरून बार आणि नाईट क्लममध्ये काम करतात. चांगलं गिऱ्हाईक मिळाल्यावर रेन्टल वाईफ बनतात. महिलेचं वय, सौंदर्य, शिक्षण आणि वेळेनुसार भाड्याची रक्कम ठरली जाते. ही रक्कम 1600 डॉलर ते 1,16,000 डॉलरपर्यंत असते. धक्कादायक बाब म्हणजे ही प्रथा रोखण्यासाठी थायलंडमध्ये कोणताच कायदा नाहीये.
थायलंडमध्ये ही प्रथा वेगाने वाढत आहे. जपान आणि कोरियामध्ये ही प्रथा आधीपासूनच आहे. थायलंडमध्ये हा ट्रेंड वेगाने वाढत आहे. शहरीकरण आणि बिझी लाईफमुळे लोकांमध्ये एकटेपणा येत असल्याने ही प्रथा थायलंडमध्ये वेगाने वाढल्याचं सांगितलं जातं. त्यामुळेच लोक कायमस्वरुपी संबंध ठेवण्याऐवजी तात्पुरत्या संबंधावर भर देत आहेत.