
मध आणि पपई: या दोन्ही घटकांमध्ये त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्याचे गुणधर्म आहेत. एका भांड्यात पपई मॅश करा आणि त्यात एक चमचा मध घाला. त्यानंतर ही पेस्ट आपल्या संपूर्ण चेहऱ्यावर साधारण वीस मिनिटे ठेवा. कोमट पाण्याने आपला चेहरा धुवा.

काकडी आणि लिंबू: व्हिटॅमिन सीने समृद्ध असलेले लिंबू टॅनिंग दूर करण्यासाठी मदत करते. एका भांड्यात किसलेली काकडी घ्या आणि त्यात लिंबाचा रस मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट चेहऱ्यावर लावा.

एका भांड्यात दोन चमचे मुलतानी माती घ्या आणि त्यात तीन चमचे बटाट्याचा रस मिसळा. ही हर्बल पेस्ट चेहऱ्यावर पंधरा मिनिटे लावल्यानंतर सामान्य पाण्याने धुवा. मुलतानी माती पिंपल्स दूर करेल.

स्ट्रॉबेरीपासून बनवलेली ही पेस्ट नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करेल. ते बनवण्यासाठी किसलेल्या स्ट्रॉबेरीमध्ये मिल्क क्रीम मिक्स करा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि साधारण 10 मिनिटांनी पाण्याने धुवा.

केशरचा वापर सूर्यप्रकाशात होणारा दाह बरा करण्यासाठी प्राचीन काळापासून केला जातो. दुधात काही केशर टाका आणि ही पेस्ट चेहऱ्यावर लावा. साधारण 10 मिनिटे तसेच ठेवल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. (टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)