
तु्म्ही कधी गोकर्णाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला ब्लू टी प्यायला आहात का? जर नसेल तर एकदा घेऊन बघा. गोकर्णाच्या पाकळ्यांपासून तयार केलेला चहा आरोग्यवर्धक आहे. या चहाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचा तजेलदार होते.

गोकर्णाच्या फुलांच्या पाकळ्यांपासून तयार केलेल्या चहाच्या सेवनाने शरीरातील चरबी आणि रक्तातील साखरेची पातळी कमी होते. त्वचा आणि केस निरोगी होतात. यामुळे पचनसंस्थाही सुधारते. पचनाची समस्या असलेल्यांनी दररोज दोन कप ब्लू टी प्यायल्यास चांगले परिणाम दिसून येतील.

ब्लू टीमध्ये तणाव कमी करण्याचे गुणधर्म असता. चिंता आणि नैराश्य देखील यामुळे कमी होते. तसेच उल्हासित वाटतं. दिवस एकदम फ्रेश जातो आणि काम करण्यासाठी उत्साह मिळतो.

ब्लू टीच्या सेवनामुळे दमा असलेल्यांना आराम मिळतो. शरीरातील उष्णता कमी होते. तसेच मधुमेह टाळता योतो. गोकर्णाची फुलांमध्ये औषधी गुणधर्म आहेत. त्यामुळे कोणीही पिऊ शकतं.

ब्लू टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब कमी होतो. हृदयाचे आरोग्य सुधारते. रक्ताच्या गुठल्या होत नाहीत. त्यामुळे हृदयविकार असलेल्यांसाठी हा ब्लू टी आरोग्यवर्धक आहे. या चहामुळे रोगप्रतिकार शक्तिही वाढते. (सर्व फोटो टीव्ही 9 नेटवर्क) ( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)