ओठांचा आकार आणि त्याच्या रंगावरुन ओळखा स्वभाव, बारीक ओठ असलेल्या व्यक्ती….

सामुद्रिक शास्त्रानुसार, ओठांचा आकार आणि रंग व्यक्तीच्या स्वभावाचे आणि भविष्याचे अनेक रहस्य उलगडतात. तुमच्या ओठांमुळे तुमच्या आयुष्यातील चढ-उतारांची गाथा कशी सांगते, हे जाणून घेण्यासाठी या शास्त्राचा सखोल अभ्यास करणे आवश्यक आहे.

| Updated on: Jul 01, 2025 | 4:00 PM
1 / 15
ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र आणि हस्तरेषाशास्त्र यांसारख्या प्राचीन भारतीय शास्त्रांप्रमाणेच सामुद्रिक शास्त्र हे देखील व्यक्तीच्या स्वभावाचे आणि भविष्याचे गूढ उलगडणारे एक महत्त्वाचे शास्त्र आहे. यात शरीराच्या विविध भागांच्या आकारावरून व्यक्तीचा स्वभाव कसा आहे, याचा अंदाज लावला जातो.

2 / 15
आज आपण एखाद्या व्यक्तीच्या ओठांचा आकार आणि त्याचा रंग यावरुन त्याचा स्वभाव कसा असेल, याबद्दल जाणून घेऊ या.

3 / 15
सामुद्रिक शास्त्रानुसार, ज्या लोकांचे ओठ मोठे असतात, ते अतिशय वैभवशाली जीवन जगणारे असतात. त्यांना सुख-सुविधांच्या वस्तूंचे खूप वेड असते. ते कामामध्ये अतिशय योग्य असतात आणि त्यांना प्रवास करायला खूप आवडतो.

4 / 15
मोठे ओठ असणारे लोक कोणाशीही पटकन मैत्री करतात. त्यांची मैत्री टिकते. त्यांच्यामध्ये उत्कृष्ट नेतृत्व गुण असतात. ते नेतृत्व करण्यात पारंगत असतात. पण हे लोक बोलायला थोडे फटकळ असतात. त्यांना स्पष्टवक्तेपणासाठी ओळखले जाते.

5 / 15
ज्या लोकांचे ओठ बारीक असतात, ते खूप संवेदनशील असतात. व्यवसाय आणि करिअरच्या बाबतीत ते सावधगिरीने पावलं टाकतात. जीवनात यशस्वी होण्यासाठी त्यांना खूप कष्ट करावे लागतात.

6 / 15
बारीक ओठ असलेल्या व्यक्ती दिसायला आकर्षक असतात. तसेच त्या प्रामाणिकही असतात. व्यवसायात ते खूप प्रगती करतात आणि त्यांचा स्वभाव विनोदी असतो.

7 / 15
ज्या महिलांचे वरचे ओठ जाड असतात, त्या खूप महत्त्वाकांक्षी असतात. त्यांना आयुष्यात काहीतरी मोठे करण्याची कायम इच्छा असते. अशा महिला एकट्याने जीवन जगण्याचा विचार करतात. त्यांना गर्दीच्या ठिकाणी जायला आवडत नाही.

8 / 15
वरचे ओठ जाड असलेल्या व्यक्ती कायम आयुष्यात आनंदी राहण्याचा प्रयत्न करतात. त्यांना इतरांच्या आयुष्याची फारशी पर्वा नसते. ते कायमच स्वत:बद्दल विचार करतात.

9 / 15
लाल रंगाचे ओठ असलेल्या व्यक्ती रागीट स्वभावाच्या असतात. त्या निडर आणि साहसी असतात. कधीकधी त्या चौकटीबाहेर जाऊन काम करतात. त्यांना स्वतःच्या ताकदीवर सर्व काही साध्य करण्याची हौस असते आणि त्यात ते यशस्वीही होतात.

10 / 15
लाल रंगाचे ओठ असलेल्या व्यक्ती जितका पैसा कमावतात, तितकाच तो खर्चही करतात. या व्यक्ती अभ्यासात खूप हुशार असतात.

11 / 15
ज्या व्यक्तींचे ओठ खूप जाड आणि रुंद असतात, ते सहजपणे वादात अडकतात. त्यांना अनेकदा अपमान सहन करावा लागतो. या व्यक्ती खूप जिद्दी असतात.

12 / 15
गुलाबी ओठ असणाऱ्या व्यक्ती बुद्धिमान आणि चांगल्या मनाच्या असतात. त्यांना त्यांच्या कार्यकर्तृत्वामुळे समाजात सन्मान मिळतो. स्वभावाने दयाळू असलेल्या या व्यक्ती कायम दुसऱ्यांना मदत करण्यासाठी तयार असतात.

13 / 15
लहान आकाराचे ओठ असलेल्या व्यक्तींना प्रदर्शन करण्याची हौस असते. त्यांच्याकडे पुरेसा पैसा असतो. पण त्यापेक्षा ते अधिक श्रीमंत असल्याचं दाखवतात. या वाईट सवयीमुळे बाकीची माणसं त्यांच्यापासून दुरावतात.

14 / 15
लहान आकाराचे ओठ असलेल्या व्यक्ती हुशार आहेत. त्या फार मेहनती असतात. पण त्यांच्या पदरी कायमच निराशा पडते. ते फारशी प्रगती करू शकत नाहीत.

15 / 15
ज्या व्यक्तींचे ओठ बाहेरच्या बाजूला असतात, त्यांच्या आयुष्यात अनेक चढ-उतार येतात. या व्यक्तींना दुसऱ्यांना मदत करायला आवडते. या व्यक्ती वाईट व्यसनात अडकण्याची शक्यता जास्त असते.