जपानच्या माऊंट फुजीसमोर माधुरी दीक्षित-श्रीराम नेने यांचं समुराई स्टाइल फोटोशूट

माधुरी दीक्षित आणि श्रीराम नेने हे जपानमध्ये सुट्ट्यांचा मनमुराद आनंद घेत आहेत. तिथल्या पारंपरिक पोशाखात त्यांनी माऊंट फुजीसमोर पोझ दिले आहेत. त्यांच्या या फोटोंवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

| Updated on: Feb 22, 2026 | 2:05 PM
1 / 5
बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे जपानमध्ये भटकंती करत आहेत. या ट्रिपचे सुंदर फोटो माधुरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

बॉलिवूडची 'धकधक गर्ल' अर्थात अभिनेत्री माधुरी दीक्षित सध्या पतीसोबत सुट्ट्यांचा आनंद घेतेय. माधुरी दीक्षित आणि तिचे पती डॉ. श्रीराम नेने हे जपानमध्ये भटकंती करत आहेत. या ट्रिपचे सुंदर फोटो माधुरीने इन्स्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.

2 / 5

हे ठिकाण परंपरा, मंदिरं, बर्फ आणि समुराई कथांनी भरलेलं आहे, असं कॅप्शन देत माधुरीने हे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले आहेत. माधुरी आणि श्रीराम नेने यांच्या फोटोंमध्ये बर्फाच्छादित माऊंट फुजीचं सुंदर दृश्य पहायला मिळतंय.

3 / 5

माधुरी आणि श्रीराम नेने हे दोघंही उत्तम खवय्ये असून त्यांनी जपानमधील विविध पदार्थांचा आस्वाद घेतला आहे. त्याचसोबत 'जसा देश तसा वेश' या उक्तीप्रमाणे दोघांनीही जपानचा पारंपरिक पोशाख परिधान करत माऊंट फुजीसमोर फोटोसाठी पोझ दिले आहेत.

4 / 5

श्रीराम नेने यांनी हातात तलवार घेऊन समुराई स्टाइलमध्ये पोझ दिली आहे. तर माधुरीच्या सुंदर हास्याने नेटकऱ्यांची मनं जिंकली आहेत. या फोटोंवर अवघ्या काही तासांत हजारो लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव झाला आहे.

5 / 5

माऊंट फुजी ही जपानमधील ज्वालामुखी शिखर आहे. इथलं नेत्रदीपक दृश्य जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतं. आसपासच्या तलावांमुळे माऊंट फुजीचं दृश्य अधिकच मोहक बनतं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us