
हिंदी चित्रपटसृष्टीत 80-90 च्या दशकात अनेक देखण्या आणि दमदार अभिनेत्रींचा दबदबा होता. त्या काळातील चित्रपटांची एक वेगळीच ओळख होती. मर्यादित अॅक्शन, साधी पण हृदयाला भिडणारी कथा, रोमान्स, भावना आणि दमदार गाणी.

अनेकदा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसे चालत नाहीत. मात्र. त्यातील गाणी मात्र सुपरहिट होतात. अशाच एका चित्रपटाबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत, ज्याची कथा प्रेक्षकांना आवडली नाही पण गाणी मात्र सुपरहिट झाली.

1995 साली प्रदर्शित झालेला याराना हा रोमँटिक थ्रिलर चित्रपट त्या काळात चांगलाच चर्चेत होता. या चित्रपटात माधुरी दीक्षित, ऋषि कपूर, राज बब्बर, शक्ति कपूर, कादर खान आणि तेज सप्रू यांसारखे दिग्गज कलाकार झळकले होते.

सुमारे 4.75 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटाची कथा एका तरुणीभोवती फिरते. तरीदेखील प्रेक्षकांना कथा मनापासून आवडली नाही आणि चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.

जरी चित्रपट फ्लॉप ठरला तरी त्यातील गाणी मात्र प्रचंड लोकप्रिय झाली. विशेषतः ‘मेरा पिया घर आया’ हे गाणे आजही संगीतप्रेमींच्या प्लेलिस्टमध्ये कायम आहे. या चित्रपटात एकूण सात गाणी होती. सर्व गाणी सुपरहिट ठरली.

‘मेरा पिया घर आया’ या गाण्यातील माधुरी दीक्षितच्या दमदार डान्सने त्या काळात अक्षरशः धुमाकूळ घातला होता. आजही हे गाणे विविध कार्यक्रमांमध्ये आणि सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ऐकले जाते. आयएमडीबीवर या चित्रपटाला 4.3 अशी रेटिंग मिळाली आहे.