
पुरणपोळीच्या चवीला जगात कुठेच तोड नाही. कोणत्याही शुभ प्रसंगी किंवा सण असेल तेव्हा महाष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाच्या घरात पुरणपोळीचा बेत असतो. पुपणपोळी म्हणजे महाराष्ट्राची ओळख असं म्हणालया हरकत नाही.

सर्वांच्या आवडीचा पदार्थ म्हणजे मोदक... नाव घेताच तोंडाला पाणी येतं. गणपती, संकष्टी चतुर्थी, अंगारकीच्या अंगारकी चतुर्थी अशा खास दिनी गणपतीच्या बप्पांना आवडणारा मोदक सर्वांना प्रचंड आवडतो.

पिठलं भाकर म्हणजे... काही बोलायलाच नको. पिठलं भारकी सोबत चवीला कांदा प्रचंड चविष्ट लागतो. पिठलं भाकरीला झुनका भाकर देखील म्हणतात.

मुंबईकरांचा बर्गर म्हणजे वडापाव... घराबाहेर पडल्यानंतर पडापाव खायची इच्छा प्रत्येकाची होती. वडापाव जगभरातील खवय्यांना आवडतो.

नागपुरी वडाभात म्हणजे निव्वळ सुख... नागपुरी वडाभात खाण्यासाठी जगातील असंख्य खवय्ये नागपुरात येतात.

जळगावात वरण बट्टीला विशेष खाद्याचा दर्जा मिळाला असून घरी काही कार्यक्रम, लग्न सोहळा किंवा उपवास सोडताना पाहिलं प्राधान्य वरण बट्टी, घोटलेली वांग्याची भाजी आणि शिरा या जेवणाला दिलं जातं.

कोल्हापूर हे विविध पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. त्यामधील तांबडा - पांढरा रस्सा म्हणजे... काही बोलायला नकोच... पांढरा रस्सा तांबड्या रस्सा पेक्षा किंचित वेगळा असतो.