PHOTO | ‘कोरोनामुक्तां’साठी राज्यातील पहिलं पोस्ट कोव्हिड सेंटर ठाण्यात!

| Updated on: Oct 14, 2020 | 8:43 PM

कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोव्हिड सेंटर उभारले आहे.

1 / 5
कोरोनामुक्त झाल्यानंतरही उद्भवणाऱ्या विविध समस्यांवर कशी मात करायची. तसेच, कोरोनामुक्त झाल्यानंतरही आपण काय काळजी घ्यायला हवी यासाठी ठाणे महानगरपालिकेने राज्यातील पहिले अद्ययावत पोस्ट कोव्हिड सेंटर उभारले आहे.

2 / 5
कोरोनामुक्त रुग्णांसाठी राज्यातील पहिलं अद्ययावत पोस्ट कोव्हिड सेंटर ठाणे महापालिकेच्यावतीने उभारण्यात आले आहेत.

3 / 5
हे पोस्ट कोव्हिड सेंटर लोढा लक्झोरिया कॉम्प्लेक्स, माजिवडा येथील महापालिका इमातीच्या पहिल्या मजल्यावर हे अद्ययावत पोस्ट कोव्हिड सेंटर उभारण्यात आले आहे.

4 / 5
कोरोनामुक्त झाल्यानंतर कोरोना रुग्णांना जाणवणाऱ्या अनेक समस्या या सेंटरमधून सोडवल्या जाणार आहेत. त्यासाठी खास वैद्यकीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच या रुग्णांना कोरोना काळातील कटू अनुभवातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी मानोसोपचार तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ, योगतज्ज्ञ, समुपदेशक, फिजिओथेरपिस्ट आदींची नियुक्ती या सेंटरमध्ये करण्यात आली आहे. त्याशिवाय या सेंटरमध्ये अद्ययावत सुविधांनी युक्त योगा सेंटर, विश्रांती कक्ष आणि समुपदेशन सेंटरही उभारण्यात आलं आहे.

5 / 5
आज पालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी पाहणी दौरा केला. येत्या काही दिवसात या कोव्हिड सेंटरचे उद्गाटन राज्याचे नगरविकास मंत्री तथा ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तसेच राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.