Maharashtra New Deputy Chief Minister: घरातूनच राजकारणाचे धडे… सुनेत्रा पवार यांचं आहे धाराशिवशी घट्ट नातं

Maharashtra New Deputy Chief Minister: अजित पवार यांच्या निधनानंतर महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदासाठी सुनेत्रा पवार या शपथ घेणार आहेत. त्यांचे धाराशिव कनेक्शन समोर आले आहे.

| Updated on: Jan 30, 2026 | 7:58 PM
1 / 5
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्रीपदाची जागा रिक्त झाली. आता उपमुख्यमंत्री पद हे अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना देण्यात येणार असल्याचे समोर आले आहे. 31 जानेवारी रोजी सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. दरम्यान, सुनेत्रा पवार यांचे धाराशिव कनेक्शन समोर आले आहे. त्यांचे धाराशिवशी एकदम जवळचे नाते असल्याचे समोर आले आहे.

2 / 5
सुनेत्रा पवार धाराशिव जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्या राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते पद्मसिंह पाटील यांच्या बहीण आहेत. सुनेत्रा पवार यांचं बालपण धाराशिव जिल्ह्यातील तेर गावात गेलं.

3 / 5
सुनेत्रा पवार या सातत्याने सांगतात की, राजकारण आणि सामाजिक कार्याबद्दलची त्यांची आवड त्यांच्या वडिलांकडून आली आहे. ते स्वातंत्र्यसैनिक होते आणि गावातील प्रभावशाली व्यक्तींपैकी एक होते. त्यांनी हेही सांगितलं की, त्यांचं बालपण घराघरात जाऊन लोकांना भेटत, त्यांच्याशी संवाद साधत गेलं आहे.

4 / 5
पद्मसिंह पाटील आणि शरद पवार यांच्या मैत्रीमुळे सुनेत्रा आणि अजित पवार यांचं लग्न झालं. १९८५ मध्ये लग्नानंतर सुनेत्रा या बारामतीला आल्या. त्या वेळी अजित पवार यांनीही राजकारणात पाऊल टाकलं नव्हतं. अजित पवार यांनी राजकीय कारकीर्द सुरू केली आणि सुरुवातीच्या काही वर्षांत सुनेत्रा यांनी घर सांभाळलं. या काळात सुनेत्रा यांनी अजित पवार यांना व्यवसायातही मदत केली.

5 / 5
१९९३ मध्ये मुंबईतील साखळी बॉम्बस्फोटांनंतर शरद पवार मुख्यमंत्री झाले. तेव्हा अजित पवार आणि सुनेत्रा पवार मुख्यमंत्रींच्या अधिकृत निवासस्थानी म्हणजे वर्षा बंगल्यात त्यांच्यासोबत राहू लागले. त्या काळात देशात कॉम्प्युटर क्रांती जोरात होती. सुनेत्रा यांनी कॉम्प्युटर शिकण्याची ठाम इच्छा व्यक्त केली आणि ती पूर्णही केली.