Monsoon Update : 4 जुलैची तारीख लिहून ठेवा, राज्यात तुफान पाऊस बरसणार; पावसाचा नवा अंदाज आला!

आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजनुसार पुढच्या काही दिवसांत पाऊस सुरूच राहू शकतो. येत्या चार जुलैपर्यंत कोकणात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

| Updated on: Jun 29, 2026 | 9:47 PM
1 / 5
राज्यात आता मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पाऊस आल्याने आता शेतकरीदेखील पेरण्या करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत.

राज्यात आता मोसमी पाऊस पुन्हा एकदा सक्रिय झाला आहे. पाऊस आल्याने आता शेतकरीदेखील पेरण्या करण्यासाठी सज्ज झाले आहेत. काही ठिकाणी तर शेतकऱ्यांनी पेरण्याही केल्या आहेत.

2 / 5

दरम्यान, आता हवामान विभागाच्या नव्या अंदाजनुसार पुढच्या काही दिवसांत पाऊस सुरूच राहू शकतो. येत्या चार जुलैपर्यंत कोकणात सर्वत्र पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

3 / 5

राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील काही भागात मेघ गर्जना होण्याची शक्यता आहे. काही भागात सोसाट्याचा वारा वाहू शकतो. तसेच काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस होऊ शकतो.

4 / 5

पावसाचा हा अंदाज लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी शेतीतील कामाचे नियोजन करावे. शेतातील ओल लक्षात घेऊन पेरण्या कराव्यात तसेच शासकीय सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

5 / 5

काही ठिकाणी विजांच्या कडकटासह पाऊस होण्याची शक्यता असल्याने स्वत:ची काळजी घ्यावी. झाडाखाली बसू नये, जनावरांची काळजी घ्यावी, असेही आवाहन शेतकऱ्यांना करण्यात आले आहे.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us