
अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आहे. बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत तिचं ब्रेकअप झाल्याचं म्हटलं जात आहे. याच चर्चांदरम्यान दोघांनी एका फॅशन कार्यक्रमाला हजेरी लावली होती. मात्र कार्यक्रमात हे दोघं एकमेकांपासून लांब बसलेले आणि एकमेकांना दुर्लक्ष करताना दिसून आले होते. सध्या मलायका परदेशात सुट्ट्यांचा आनंद घेतेय.

मलायका मालदीवमध्ये व्हेकेशन एंजॉय करतेय. तिथले काही फोटो आणि व्हिडीओ तिने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. मलायकाने मालदीवच्या इन्फिनिटी पूलमधील बिकिनीचा फोटो पोस्ट केला आहे. तिच्या इन्स्टा स्टोरीमध्येही काही बोल्ड फोटो पहायला मिळत आहेत.

वयाच्या 50 व्या वर्षीही मलायकाचं हे फिटनेस पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. तिच्या या फोटोंवर लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे. मात्र सोशल मीडियावर एक वर्ग असाही आहे, जो तिला मालदीव हे लोकेशन निवडल्यामुळे ट्रोल करत आहे.

भारत आणि मालदीवचा वाद अनेकांना माहितच आहे. भारताकडून सोशल मीडियावर 'बॉयकॉट मालदीव'ची मोहीमच राबविण्यात आली होती. एवढं सगळं घडूनही मलायका जराही विचार न करता मालदीवला फिरायला गेली, याचा राग नेटकऱ्यांनी व्यक्त केला आहे.

'फक्त काही दिवस मजा करण्यासाठी ती तिथे गेली, यावर विश्वासच बसत नाहीये. थोडातरी कॉमन सेन्स दाखवला असला तर बरं झालं असतं. सेलिब्रिटी फक्त पैशांसाठीच काम करतात,' असे कमेंट्स नेटकऱ्यांनी केले आहेत.